NSUI Dainik Gomantak
गोवा

NSUI: राष्ट्रीय खेळांत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे पैसे लुटले; न्याय मागण्यासाठी गेलेल्या NSUI सदस्यांना घेतले ताब्यात

National Students' Union of India: गावडे यांनी सरकारी खात्यातील एका संचालकाला धमकावले, पण भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

Ganeshprasad Gogate

National Students' Union of India: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी स्वेच्छेने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे पैसे न दिल्याबद्दल गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून उत्तर मागायला गेलेल्या एनएसयूआयच्या सदस्यांना सोमवारी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे.

एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी 30 विद्यार्थ्यांसह गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या बांबोळी येथील कार्यालयाला भेट दिली, मात्र कार्यालयात असूनही कार्यकारी संचालकांनी त्यांची भेट घेतली नाही. नंतर एनएसयूआयचे सदस्य एसएजीच्या कार्यालयात बसून त्यांची मागणी करत राहिले.

यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांना कार्यकारी संचालकांची भेट घेण्यापासून रोखले. नौशाद चौधरी यांनी नंतर क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांच्या फोनालाही प्रतिसाद दिला नाही.

‘‘गावडे यांनी कला अकादमी आणि राष्ट्रीय खेळांमध्ये भ्रष्टाचार केला असून अलीकडेच त्यांनी सरकारी खात्यातील एका संचालकाला धमकावले, पण भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

अशा भ्रष्ट राजकारण्यांना शुद्ध होण्यासाठी भाजपकडे एक मोठी वॉशिंग मशीन असल्याचा आरोप चौधरी यांनी केला.

“कोणताही व्हीव्हीआयपी गोव्याला भेट देतो तेव्हा सरकार त्यांच्या पाहुणचारावर करोडो रुपये खर्च करते आणि रस्त्यांचे डांबरीकरणही करते. पण तेच सरकार विद्यार्थ्यांचे हक्काचे पैसे देण्यात अपयशी ठरले आहे.

ह्याच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय खेळ यशस्वी करण्यात मदत केली, परंतु त्यांना अद्याप पैसे देण्यात आले नाही. ‘शाहजहान घोटाळा’ने राष्ट्रीय खेळांसाठी स्वेच्छेने सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांचे पैसे लुटले आहे” असे ते म्हणाले.

इतर सदस्यांनी आरोप केला की, गेल्या चार महिन्यांपासून ते त्यांच्या पैशांच्या प्रतीक्षेत आहेत आणि सरकार ते देण्यास अपयशी ठरले आहे. “ अधिकारी आणि क्रीडा मंत्र्यांनी आमची पैसे देण्यास उशीर करून आमचे शाप घेवू नये,” असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

याला ‘शहाजहान घोटाळा’ आणि ‘विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची लूट’ असे म्हणत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नौशाद चौधरी यांच्यासह अन्य सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

“आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू आणि पुन्हा कार्यालयात येऊ,” असे चौधरी म्हणाले. त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारने पोलिस बळाचा दुरुपयोग केल्याचे उपस्थित विद्यार्थिनींनी सांगितले. "ही लोकशाही आहे का? जिथे विद्यार्थ्यांना न्याय मागताना ताब्यात घेतले जाते." असे एका विद्यार्थीनीने म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT