National Junior Kabaddi Dainik Gomantak
गोवा

National Junior Kabaddi: कबड्डीत गोव्याच्या मुलींचा धडाका

National Junior Kabaddi Tournament: चुरशीच्या लढतीत उत्तर प्रदेशला नमवून अव्वल

किशोर पेटकर

National Junior Kabaddi Tournament गोव्याच्या मुलींनी राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीत स्पर्धेत अप्रतिम खेळ केला. त्यांनी ‘फ’ गटात दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थान मिळविले. स्पर्धा हैदराबाद येथे सुरू आहे.

गोव्याच्या मुलींनी स्पर्धेतील मोहिमेला शानदार सुरवात करताना गुरुवारी रात्री चुरशीच्या लढतीत यजमान तेलंगणाला ४६-४४ असे दोन गुणफरकाने हरविले होते.

त्यानंतर शुक्रवारी त्यांनी मातब्बर उत्तर प्रदेशला ३४-३१ असे तीन गुणांच्या फरकाने नमवून सलग दुसऱ्या विजयासह उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

सामन्यातील सहा मिनिटे बाकी असताना गोव्यापाशी सात गुणांची आघाडी होती. त्या जोरावर त्यांनी आगेकूच राखली. बाद फेरीत आता गोव्यासमोर मध्य प्रदेशचे आव्हान असेल.

गतवेळी ब्राँझपदक जिंकलेल्या गोव्याच्या मुलांनीही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी गुजरातचा ४०-२५ असा १५ गुणफरकाने लीलया पराभव केला.

गुजरातला हरियानाविरुद्धही पराभूत व्हावे लागले. तीन संघांच्या ‘ब’ गटात दोन्ही सामने गमावल्यामुळे गुजरातचा संघ साखळी फेरीतच गारद झाला.

एक सामना बाकी असताना हरियाना आणि गोव्याने बाद फेरी गाठली. उभय संघातील विजेता संघ गटात अव्वल ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT