I-League 2 Football Dainik Gomantak
गोवा

I-League 2 Football: स्पोर्टिंग क्लबची केंकरे एफसीवर 2-1 फरकाने संघर्षमय विजय

I-League 2 Football: धेंपो क्लबला बंगळूर युनायटेडने नमविले

किशोर पेटकर

I-League 2 Football: स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत शनिवारी केंकरे एफसीवर २-१ फरकाने संघर्षमय विजय नोंदविला, तर माजी आय-लीग विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबला एफसी बंगळूर युनायटेडकडून १-० फरकाने हार पत्करावी लागली.

वास्को येथील टिळक मैदानावर स्पोर्टिंगने पिछाडीवरून विजय साकारला. ३४व्या मिनिटास राऊल आल्मेदा याच्या गोलमुळे केंकरे एफसीला आघाडी मिळाली.

नंतर ज्योएल कुलासोने ५७व्या मिनिटास स्पोर्टिंगला बरोबरी साधून दिल्यानंतर ८६व्या मिनिटास अलिस्टर अँथनी याने केलेला गोल गोव्यातील संघासाठी निर्णायक ठरला.

८८व्या मिनिटास केंकरे एफसीच्या अरविंदराज राजन याला दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डास सामोरे जावे लागले. स्पोर्टिंगचे आता दोन लढतीतून चार गुण झाले असून केंकरे एफसी सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.

एला-जुने गोवे येथे एक खेळाडू कमी असूनही बंगळूर युनायटेडने धेंपो क्लबला नमविले. बंगळूरमधील संघाच्या अहमद फैझ खान याला ५४व्या मिनिटाल दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले.

त्यानंतर ६३व्या मिनिटास जेरी पुलाम्ते याने केलेला गोल निर्णायक ठरला. सलग दुसऱ्या विजयामुळे बंगळूर युनायटेडचे सहा गुण झाले असून पराभवामुळे धेंपो क्लबचा एक गुण कायम राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT