Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवास बरोबरीचेच समाधान

Indian Super League: जबरदस्त मुसंडी मारलेल्या पंजाब एफसीने रोखले

किशोर पेटकर

Indian Super League: तब्बल सहा गोल झालेल्या रंगतदार, उत्कंठावर्धक लढतीत पंजाब एफसीच्या आक्रमक प्रतिहल्ल्यानंतरही एफसी गोवाने 3-3 या गोलबरोबरीचा एक गुण प्राप्त करून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील चौथा क्रमांक कायम राखला आणि प्ले-ऑफ फेरीही निश्चित केली. सामना नवी दिल्ली येथे सोमवारी झाला.

विजय हुकल्यामुळे पंजाब एफसीला प्ले-ऑफसाठी महत्त्वाचे असलेल्या सहाव्या स्थानी प्रगती साधण्याची संधी हुकली. त्यांनी 19 लढतीतील सहावी बरोबरी नोंदविली, त्यामुळे त्यांचे 21 गुण झाले व सातवा क्रमांक मिळविला.

जमशेदपूर एफसीचेही 21 गुण असून ते सहाव्या, तर तेवढेच गुण असलेला बंगळूर एफसी संघ आठव्या क्रमांकावर आहे.

एफसी गोवाची ही 18 लढतीतील सहावी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे 33 गुण झाले व चौथा क्रमांक कायम राहिला. मोहन बागान व मुंबई सिटीचे प्रत्येकी 36 गुण असून ते अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ओडिशा एफसी 35 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. एफसी गोवाने मिळालेल्या संधी वाया घालविल्या नसत्या, तर कदाचित त्यांना चुरसपूर्ण लढत जिंकता आली असती.

सहा गोलचा थरार

कार्ल मॅकह्यू याने पाचव्याच मिनिटास एफसी गोवास आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात आणखी पाच गोल झाले. विल्मार जॉर्डन याने ५४व्या, तर लुका मॅसेन याने ६१व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे पंजाब एफसीला २-१ असे वर्चस्व मिळाले.

७२व्या मिनिटास नोआ सदोई याच्या पेनल्टी गोलमुळे एफसी गोवाला २-२ अशी बरोबरी साधता आली. मात्र बदली खेळाडू हुआन मेरा याच्या गोलमुळे पंजाबने ७८व्या मिनिटास ३-२ अशी आघाडी प्राप्त केल्यानंतर एफसी गोवाने बदली खेळाडू कार्लोस मार्टिनेझच्या समयोचित गोलमुळे ३-३ अशी बरोबरी साधली.

९०+७ मिनिटाला कॉर्नरवरून नोआ सदोईच्या धोकादायक फटक्यावर गोलरक्षक रवी कुमारने चेंडू रोखून एफसी गोवा विजयाचा जल्लोष करणार नाही याची दक्षता घेतली. एफसी गोवाचा कार्ल मॅकह्यू सामन्याचा मानकरी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT