I-League Dainik Gomantak
गोवा

I-League: चर्चिल ब्रदर्सचा सलग तिसरा विजय

I-League Football Tournament: नेरोका एफसीविरुद्ध करीम सांब याची हॅटट्रिक

किशोर पेटकर

I-League Football Tournament: सेनेगल देशाचा अलहादजी अब्दौ करीम सांब याच्या हॅटट्रिकच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी नेरोका एफसीवर पिछाडीवरून 3-2 फरकाने मात केली. सामना गुरुवारी शिलाँग येथे झाला.

करीम सांब याने अनुक्रमे 22, 76 व 86व्या मिनिटास गोल केल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला 18 सामन्यांतील सहावा विजय नोंदविता आला. त्यांचे आता 23 गुण झाले असून गुणतक्त्यात सातव्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली आहे.

घानेफा अन्सुमाना क्रोमा याने आठव्या मिनिटास, तर 45+3व्या मिनिटास अनिकेत पांचाळ याने केलेल्या गोलमुळे नेरोका संघ विश्रांतीला 2-1 फरकाने आघाडीवर होता. उत्तरार्धात करीम सांब याने दहा मिनिटांत दोन गोल नोंदवत चर्चिल ब्रदर्सला संघर्षमय विजय मिळवून दिला.

नेरोका एफसीचा हा 16 सामन्यांतील 13 वा पराभव ठरला. त्यामुळे ते फक्त सात गुणांसह शेवटच्या 13 व्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही चर्चिल ब्रदर्सने नेरोका एफसीवर मात केली होती.

चर्चिल ब्रदर्सला स्पर्धेतील पुढील सामना अव्वल स्थानी असलेल्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबविरुद्ध 12 मार्च रोजी खेळला जाईल. कोलकात्यातील संघाचे सध्या 17 सामन्यांतून 38 गुण आहेत.

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सचे स्पर्धेत 18 सामने, 6 विजय, 5 बरोबरी, 7 पराभव, 23 गुण

- नेरोका एफसीचे 16 सामन्यांत 2 विजय, 1 बरोबरी, 13 पराभव, 7 गुण

- चर्चिल ब्रदर्सचे नेरोका एफसीवर सलग 2 विजय, पहिल्या टप्प्यात 4-1 असा विजय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT