Durand Cup Football Dainik Gomantak
गोवा

Durand Cup Football: एफसी गोवाचे आव्हान संपुष्टात

मोहन बागानचा उपांत्य लढतीत 2-1 फरकाने निसटता विजय

किशोर पेटकर

Durand Cup Football एफसी गोवा संघाचे 132 व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेतील आव्हान गुरुवारी उपांत्य फेरीत संपुष्टात आले. बदली खेळाडू आर्मांदो सादिकू याने उत्तरार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर मोहन बागान सुपर जायंट्स संघाने 2-1 अशा निसटत्या विजयासह स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. कोलकात्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालशी त्यांची आता विजेतेपदासाठी लढत होईल.

एफसी गोवा आणि मोहन बागान यांच्यातील सामना कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर झाला. दोन्ही संघ विश्रांतीला 1-1 असे गोलबरोबरीत होते. ह्युगो बौमो याच्या चुकीचा लाभ उठवत मोरोक्कन नोआ सदोई याने 22 व्या मिनिटास एफसी गोवा संघाला आघाडी मिळवून दिली.

त्याचा यंदाच्या स्पर्धेतील सहावा गोल ठरला. 42 व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन जेसन कमिन्स याने पेनल्टी फटक्यावर मोहन बागानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मात्र यावेळी पेनल्टी फटक्याची खूण करण्याचा रेफरीचा निर्णय वादग्रस्त ठरला.

टीव्ही रिप्लेमध्ये एफसी गोवाच्या खेळाडूने मोहन बागानच्या आशिक कुरुनियान याला पाडले तेव्हा तो गोलक्षेत्राच्या बाहेर असल्याचे दिसत होते. याबाबत एफसी गोवा संघातील खेळाडूंनी निषेधही नोंदविला.

बदली खेळाडूचा गोल निर्णायक

मोहन बागानचे प्रशिक्षक हुआन फेर्रांडो यांनी 57 व्या मिनिटास बौमो याच्या जागी अल्बेनियाच्या आर्मांदो सादिकू याला मैदानात उतरविले. 61 व्या मिनिटास त्याने आपली निवड सार्थ ठरविली.

त्याने एफसी गोवाच्या बचावफळीत मुसंडी मारताना बचावपटू संदेश झिंगन याला चूक करण्यास भाग पाडले आणि सणसणीत फटक्यावर गोलरक्षक धीरज सिंग याला संधी दिली नाही.

धीरज चेंडू अडविण्यासाठी झेपावला, पण त्याला ते शक्य झाले नाही. सामन्यातील काही मिनिटे बाकी असताना एफसी गोवाने बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथ याचा बचाव भेदणे त्यांना शक्य झाले नाही.

इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटास त्याने एफसी गोवाच्या जय गुप्ता याचे हेडिंग चपळाईने अडवत मोहन बागानची आघाडी अबाधित राखली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT