Ranji Trophy Cricket
Ranji Trophy Cricket Dainik Gomantak
गोवा

Ranji Trophy Cricket Tournament: स्नेहलच्या झुंजार अर्धशतकाने सावरले

किशोर पेटकर

Ranji Trophy Cricket Tournament रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यावेळच्या मोसमात मागील तीन डावांत फक्त 27 धावा केलेल्या अनुभवी स्नेहल कवठणकर याची बॅट योग्यवेळी तळपली. त्याच्या झुंजार 83 धावांच्या खेळीमुळे कर्नाटकविरुद्ध सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गोव्याला 8 बाद 228 धावा करता आल्या.

म्हैसूर येथील श्रीकांतदत्त नरसिंह राजा वडियार क्रिकेट मैदानावर शुक्रवारपासून चार दिवसीय सामन्याला सुरवात झाली. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण कर्नाटकने त्यांना आरंभीच कोंडीत पकडले.

3 विकेट 45 धावांत गमावल्यानंतर स्नेहलने कर्णधार दर्शन मिसाळ (39) याच्या साथीत चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करून गोव्याला सावरले. डावखुरा फिरकी गोलंदाज रोहित कुमारच्या गोलंदाजीवर दर्शन यष्टिचीत बाद झाला.

मागील सामन्यातील शतकवीर दीपराज गावकर याला रोहितनेच शून्यावर बाद केल्यामुळे गोव्याची स्थिती चहापानापूर्वी 5 बाद 131 अशी स्थिती झाली.

स्नेहलला संघात पुनरागमन करणाऱ्या समर दुभाषी (19) याने समजूतदारपणे साथ दिली. त्यामुळे दोनशे धावांचे लक्ष्य बाळगणे शक्य झाले. समरला वैशाख याने बाद केल्यामुळे सहाव्या विकेटची 50 धावांची भागीदारी संपुष्टात आली.

दिवसातील 15 षटकांचा खेळ बाकी असताना वेगवान गोलंदाज एम. व्यंकटेश याने स्नेहलची एकाग्रता भंग केली आणि तो निकिन जोस याच्या हाती झेल देऊन बाद झाला. स्नेहलने 193 चेंडूंतील खेळीत नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने 83 धावांची शानदार खेळी केली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: ८७ षटकांत ८ बाद २२८ (ईशान गडेकर ६, सुयश प्रभुदेसाई २४, के. व्ही. सिद्धार्थ २, स्नेहल कवठणकर ८३, दर्शन मिसाळ ३९, दीपराज गावकर ०, समर दुभाषी १९, अर्जुन तेंडुलकर नाबाद १०, मोहित रेडकर १६, हेरंब परब नाबाद ६, व्ही. कौशिक १-३६, व्ही. वैशाख ३-४५, एम. व्यंकटेश १-२५, ए. सी. रोहित कुमार ३-६६).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT