Goa Special Event

 

Dainik Gomantak

गोवा

गोव्यातील आजचे विशेष कार्यक्रम

श्री शांतादुर्गा देवस्थानच्या कालोत्सवानिमित्त मंदिरात सकाळी आठ वाजता देवतापूजन, लघुरुद्र व महापूजा. त्यानंतर 9 वा. श्री देवी शांतादुर्गेच्या नूतन उत्सव मूर्तीची पालखीतून गावात मिरवणूक..

दैनिक गोमन्तक

Goa Special Event पेडणे (Pernem): नागझर येथील वंसदेवाचा जत्रोत्सवानिमित्त सकाळी मंदिरात अभिषेक तसेच धार्मिक विधी, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, समराधना व महाप्रसाद होईल. त्यानंतर गावातील सुवासिनीचा तसेच देवाची ओटी भरण्याचा कार्यक्रम. रात्री 11 वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक, रात्री 12 वाजता कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळ नेरूर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग.

अस्नोडा(Assonora): श्री शांतादुर्गा देवस्थानच्या कालोत्सवानिमित्त मंदिरात सकाळी आठ वाजता देवतापूजन, लघुरुद्र व महापूजा. त्यानंतर 9 वा. श्री देवी शांतादुर्गेच्या नूतन उत्सव मूर्तीची पालखीतून गावात मिरवणूक, रात्री नऊ वाजता देवीचे देवळात आगमन. दहा वाजता श्री देवी शांतादुर्गेच्या पालखीची देवळासभोवती मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर आरती. रात्री 11.45 वाजता मामा मोचेमाडकर यांचे ‘दशावतार’ नाटक.

फोंडा(Ponda): वाडी तळावली येथील श्रीलक्ष्मीनारायण देवस्थानच्या कालोत्सवानिमित्त सकाळी पालखी मिरवणूक, रात्री भजन, महाआरती, श्रींची सुखासनातून मिरवणूक, नंतर श्री महालक्ष्मी युवक संघातर्फे ऐतिहासिक नाटक ‘करीन ती पूर्व’.

फोंडा: धारबांदोडा उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयातर्फे प्रशासन आपल्या दारी दाभाळ पंचायतक्षेत्रातील इमॅक्युलेट कन्सेप्शन हायस्कूलमध्ये स. 9 ते 1.15 वा.पर्यंत.

कुडचडे: श्री पुरुषम्हारू देवस्थानात रात्री 7.30 वा. ‘रोंट’ घालण्याचा विधी.

आगशी: धाकटेबाग-डोंगरी येथील श्री जगदंबा षष्टी शांतादुर्गा देवीच्या पारंपरिक कालोत्सवानिमित्त सकाळी नवग्रहपूर्वक नवचंडी हवन, अभिषेकादी धार्मिक विधी, सायं. 6 वा.सुवासिनींच्या दिवजोत्सवासहित पालखी मिरवणूक, 10 वा. बालकलाकारांकडून रात्रकालोत्सव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT