Sonsodo Dump Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Dump: सोनसडो कचऱ्याला पुन्हा आग, सहा महिन्यांत चौथ्यांदा घडली घटना

आग विझविण्यासाठी पाण्याचे दोन टॅंकर वापरण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sonsodo Dump सोनसडो कचरा प्रकल्पातील शेडमधील कचऱ्याला गुरुवारी (ता.२४) सकाळी आकस्मिक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवनांनी माहिती मिळताच लागलीच घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.

ही घटना सकाळी ७.३० ते ८ वा.दरम्यान घडली. सोनसडोच्या कचऱ्याला आग लागण्याची ही गत सहा महिन्यांतील चौथी वेळ आहे.

यापूर्वी ४ मार्च रोजी शॉर्टसर्किटमुळे, २२ एप्रिल व नंतर हल्लीच जुलै महिन्यात आग लागली होती. दोन तास शर्थीचे प्रयत्न व १२ हजार लिटर पाण्याचा वापर करून आग विझविण्यात आली होती.

सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी आम्हाला आग लागल्याची बातमी मिळताच लगेच तिथे गेलो. मात्र, जेसीबीमुळे आम्हाला आत जायला थोडा उशीर झाला. तरीही आग आटोक्यात आणण्यात आम्हाला यश आले.

आग विझविण्यासाठी पाण्याचे दोन टॅंकर वापरण्यात आले. आता आग नियंत्रणाखाली असून केवळ धूर येत आहे व परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत.

-हेर्कुलान सौझा, अग्निशमन दलाचे अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT