Sneak Statue seller in Vasco, (Goa)  Pradip Naik / Dainik Gomantak
गोवा

Goa: नागपंचमीनिमित्त वास्को बाजारात नागाच्या मुर्त्या उपलब्ध

पातोळ्या बनवल्या जाणारी हळदीची पाने उपलब्ध (Goa)

Siddhesh Shirsat

वर्ष पद्धतीप्रमाणे चतुर्थी (Before Chaturthi) अगोदर श्रावण महिन्यात (Shravan month) नागपंचमी (Naag Panchami) साजरी केली जाते. ज्या घरात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) साजरी केली जाते, त्या घरात नागपंचमी दिवशी नागाच्या मूर्तीची (Sneak Statue) पूजा केली जाते. सकाळी नाग पुजेला लागल्यानंतर नागाला नैवेद्य दाखवला जातो. यात पातोळ्यांचा नैवद्य मुख्य असतो. नारळाचे चुन, गुळ घालून तांदळाच्या पीठाचे हळदीच्या पानावर लावून नंतर ते उकळले जाते. ही पातोळी मग नैवेद्य म्हणून खाल्ला जातो.

दरम्यान नागपंचमीला लागणारे साहित्य वास्कोत उपलब्ध झाल्याने आज ते खरेदी करण्यासाठी लोकांची संध्याकाळी बाजारात वर्दळ दिसली. सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने या साहित्य विक्रीवर परिणाम झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रात म्हणतात इतका व्यवसाय झाला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नागाची प्रतिमा तीस, पन्नास, शंभर अशा दराने त्यांच्या आकारानुसार विक्रीस उपलब्ध होती. तर पातोळ्याची हळदीची पाने तीस रुपयाला २५ पानांचा एक गठ्ठा असे विक्रीस उपलब्ध होते. तसेच गुळ, नारळ, तांदळाचे पीठ खरेदीसाठीही लोकांनी दुकानात गर्दी केलेली दिसली. दरम्यान पूजनासाठी भक्तगण सज्ज झाले असून त्यासाठी आजपासून प्रत्येक घरात लगबग सुरू होती. सकाळी नाग पुजल्यानंतर संध्याकाळी त्याचे विसर्जन केले जाणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT