Road
Road Dainik Gomantak
गोवा

Siolim News: शिवोलीत रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर

Ganeshprasad Gogate

Siolim News: छत्रपती शिवाजी सर्कल शिवोली बाजारपेठेत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असून या कामाचा आजचा तिसरा दिवस आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम सुरु केले असून रस्त्यानजीकची दुकाने तसेच काही दुकानांचा रस्त्यावर येणारा भाग हटवण्याचे काम यावेळी सुरु होते.

मोरजी, हरमल, केरी, मोपा विमानतळाला जोडणारा हा महत्वाचा रस्ता असून शिवोली चोपडे पूल, आसगाव पंचायत पर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे.

रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटणार असून दोन्ही बाजूंनी फुटपाथ उभारले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ठराविक जमिनीपासून दुकाने मागे घेणाच्या सूचना विभागातर्फे दुकानदारांना करण्यात आल्या असून त्यासंबंधीच्या नोटिसाही संबंधित जागेतील दुकानदारांना पाठवण्यात आल्या असल्याचे यावेळी पंचायत मेम्बर आणि उपस्थित सर्वांनी सांगितले.

या कामादरम्यान कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी विद्युत विभागातील जेई अधिकारी तसेच सरपंच अभय शिरोडकर यांच्यासह शिवोली मारणा पंचायतीचे सदस्यअमित मोरजकर आणि संदेश हडफडकर यांच्यासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

काही दिवसांपूर्वी शिवोली-चोपडे पुलापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते.

शिवोली, हरमल मोरजी हा गोव्यातील किनारी भाग असून या भागात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. विशेषतः पर्यटन हंगामात ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते. अशावेळी रास्ता रुंदीकरण महत्वाचे असल्याचे बोलले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT