Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: पणजीत 11 मार्च रोजी शिगमोत्सव

बैठकीत निर्णय : 18 जून मार्गावर मिरवणूक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Shigmotsav 2023: पणजीत येत्या 11 मार्च रोजी शिगमोत्सव होणार आहे. शहरात होणाऱ्या या उत्सवासाठी 18 जून मार्गावर मिरवणूक निघणार आहे. सध्या शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी व मलनिस्सारणाची भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या शिगमोत्सवाच्या नियोजनाविषयी महापौर रोहित मोन्सेरात यांनी मंगळवारी सायंकाळी बैठक घेतली.

या बैठकीसाठी उपमहापौर संजीव नाईक, अभियंता विवेक पार्सेकर, त्याशिवाय पणजी शिगमोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. प्राथमिक स्तरावर या बैठकीत चर्चा झाली असून, त्यानंतर पोलिस, साबांखा, वाहतूक विभाग, स्मार्ट सिटी अशा कार्यालयांचे प्रतिनिधींबरोबर बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या या बैठकीत शहरातील वाहतूक वळविण्याबरोबरच लोकांना उभे राहण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या जागेबाबतचा विचार करण्यात आला. कार्निव्हलची बांदोडकर मार्गावरून मिरवणूक निघाली होती, त्यामुळे 18 जून रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर करण्यात आला होता.

आता 18 जून रस्त्यावरून शिगमोत्सव मिरवणूक होणार असल्याने त्या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळविण्यात येईल, त्याबाबतचे नियोजन पोलिसांच्या वाहतूक खात्याकडून केले जाईल.

स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याने शहरातील मध्यवर्ती ठिकाणचे १८जून मार्गाला जोडणारे रस्ते बंद होतील. मंगळवारच्या बैठकीत शिगमोत्सवाच्या महापालिकेच्यावतीने आवश्‍यक त्या सुविधा देण्याबाबतही चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT