Goa Shigmo Festival 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmo Festival : शिरोड्यातील शिवनाथाचा वार्षिक शिमगोत्सव साजरा

Goa Shigmo Festival : या शिमगोत्सवानिमित्त प्रत्येक गुरूमांडावर श्री सत्यनारायण महापूजा, भजन तसेच नाट्यप्रयोगांचे आयोजन केले जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmo Festival :

बोरी, ‘ओस्सय ओस्सय’चा गजर आणि ढोलताशा-कासाळ्याच्या निनादात शिरोडा येथील श्री शिवनाथाचा वार्षिक पारंपरिक चतुर्दशी शिमगोत्सव शनिवार, २३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पारंपरिक शिमगोवेश परिधान करून गळ्यात फुलांच्या माळा घालून डोक्यावर भगवे फेटे बांधून ढोलताशांच्या आवाजात पारंपरिक जती गात, नाचत-गात, गावातील बाजार चावणुको शिमगोमेळ, पाज, दाबोली, करमणे डोंगर, वाजे, तारीवाडा, तळपणे, वजनगाळ शिमगोमेळ बाजारात जमा झाले होते.

प्रत्येक रोमटकराच्या हातात गुढ्या, छत्र्या, अबदागिरे, तोरणे होती. नाचत-गात भव्य मिरवणुकीत रोमटामेळ श्री शिवनाथ देवाच्या भेटीला आले व प्रत्येकांनी देवाच्या चरणी आपली सेवा रुजू केली. त्यानंतर रोमटामेळ आपापल्या भागात जाऊन पूर्वापार पद्धतीने घरोघरी जाऊन रोमट खेळले.

या रोमटात आबालवृद्ध सहभागी झाले होते. बाजार व शिवनाथ परिसरात रोमटामेळ मिरवणूक बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. या शिमगोत्सवानिमित्त प्रत्येक गुरूमांडावर श्री सत्यनारायण महापूजा, भजन तसेच नाट्यप्रयोगांचे आयोजन केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: '..तर मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही'! कोहलीच्या विधानाने चाहत्यांना धक्का; तुफानी फटकेबाजीबद्दल म्हणाला की..

CM Pramod Sawant: ‘कशे आसात दोतोर?’ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साखळीत गर्दी; आरोग्याची केली विचारपूस

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

SCROLL FOR NEXT