Shack Owner Meeting Dainik Gomantak
गोवा

Shack Owner : मॉडेल शॅक आणि नवीन पर्यटन धोरणाला शॅक मालकांचा विरोध

शॅक मालक संघटनेची बैठक पार पडली

Rajat Sawant

Shack Owner : पर्यटन खात्यातर्फे राबवलेल्या मॉडेल शॅक आणि नवीन पर्यटन धोरणाला शॅक मालक संघटनेने ठाम विरोध दर्शविला आहे. आज शॅक मालक संघटनेची बैठक पार पडली. यावेळी शॅक मालकांनी त्यांच्या अनेक समस्या मांडल्या.

राज्यातील समुद्रकिनारी नळ जोडणी, सांडपाणी निचरा व इतर सुविधा निर्माण करण्यास सरकार आणि पर्यटन खाते अपयशी ठरल्यामुळेच विद्यमान समस्या उद्भवल्याचा आरोपही गोवा शॅक मालक संघटनेचा बैठकीत करण्यात आला.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गोवा सरकारने शॅक मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. सरकारने कारवाई सुरूच ठेवल्यास शॅक पूर्ण बंद करण्याचा इशारा शॅक मालकांनी दिला.

कुणाचाही शॅक परवाना रद्द करु दिला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा अन्यथा आमच्याकडून सहा वर्ष शुल्क घेऊ नये. आम्ही समुद्रकिनारी सर्व सुविधा निर्माण करु असा दावा शॅक मालक संघटनेने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT