Goa Sexual Assault Dainik Gomantak
गोवा

Goa Sexual Assault: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 25 वर्षीय परप्रांतीय तरुणाला अटक

आज बुधवारी संध्याकाळी उशीरा आरोपीला वाळपई पोलिसांकडून अटक करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sexual Assault अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी गोव्यात काम करणाऱ्या आणि मूळचा जोधपूर राजस्थान येथील रहिवासी असलेल्या रामनिवास बिस्नोई (25) याला अटक केली आहे.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबांना सांगितल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी वाळपई पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानंतर आज बुधवारी संध्याकाळी उशीरा आरोपीला वाळपई पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाळपई पोलिस निरिक्षक दिनेश गडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

गोव्यात सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून दिवसागणिक अत्याचार, विनयभंग, छेडछाड असे प्रकार घडत आहेत. पोलीस प्रशासन असल्याप्रकारांवर आला घालण्यासाठी प्रयत्नशील असले तरी वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT