Goa Sex Scandal case Girish Chodankar expose minister name Milind Naik 

 
गोवा

गिरीश चोडणकरांनी केले सेक्स स्कँडल प्रकरणातील मंत्र्याचे नाव जाहीर

‘सेक्स स्कॅंडल’ झाल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एकच खळबळ उडवून दिली होती.

दैनिक गोमन्तक

सेक्स स्कँडलमध्ये मंत्रिमंडळातील मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांच्याकडून उघड. कथित आरोपाचा व्हिडिओ वा ऑडिओ नाही मात्र त्यांनी महिलेवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. दिलेल्या मुदतीत सरकार कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने हे नाव उघड केल्याचे चोडणकरांनी सांगीतले आहे. (Goa Sex Scandal case Girish Chodankar expose minister name Milind Naik )

दरम्यान या प्रकरणी आता मंत्री मिलिंद नाईक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर पणजीत महिला पोलिस स्थानकावर पोहोचले असून या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऑडिओ व व्हिडिओ या पुराव्यासह तक्रार दाखल करणार आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने एका महिलेवर अत्याचार केल्याचा व ‘सेक्स स्कॅंडल’ झाल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्याला उद्या पंधरा दिवस होत असून ते उद्या त्या संबंधित मंत्र्याचे नाव उघड करणार का याची उत्सुकता राज्यभर लागून राहिली आहे. तत्पूर्वी गिरीश यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन त्या मंत्र्याचे नाव राज्यपालांना सांगितले आहे.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्र्याकडून महिला अत्याचार आणि सेक्स स्कँडलचा विषय जोरदार चर्चेत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपच्या मंत्र्याने महिलेवर अत्याचार करून सेक्स स्कँडल घडविल्याचे जाहीर आरोप केल्याने खळबळ माजली होती. राज्यपाल प्रशासकीय आणि मंत्रिमंडळाच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, ते मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन आणि सूचना करू शकतात. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे येईल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील संबंधित महिलेने तक्रार करावी असे अगोदरच म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात कारवाईची अपेक्षा कमी आहे. मात्र, काँग्रेस हे प्रकरण किती लावून धरते यावर सर्व अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT