Goa tourism beach stray dogs waste problem  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: ऐन पर्यटन हंगामात किनारे अस्वच्छ! भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर; कंत्राटदाराची उदासीनता कारणीभूत

Goa Beach Problems: गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. त्यामुळे किनारे स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे.

Sameer Panditrao

Goa tourism beach stray dogs waste problem

पणजी: गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. त्यामुळे किनारे स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. परंतु समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे स्थानिक व्यावसायिक व पर्यटक संतप्त झाले आहेत. गोवा पर्यटन विभागाने नियुक्त केलेल्या समुद्रकिनारा स्वच्छता कंत्राटदाराला कचरा संकलन नियमित करण्यात अपयश आले आहे.

याबाबत बोलताना क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले की, कचऱ्यासोबतच भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनत आहे. भटकी कुत्री समुद्रकिनाऱ्यांवर सतत फिरत असतात आणि पर्यटकांच्या मागे धावतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात भीतीचे वातावरण तयार होत आहे. शॅक्‍समालकांनी आपल्या परिसरात स्वच्छतेसाठी योग्य कचरा व्यवस्थापन पद्धती राबविल्या आहेत. परंतु कंत्राटदाराच्या अपयशामुळे आमच्या प्रयत्नांवर पाणी फिरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

दरम्‍यान, आजही कचरा आहे तसाच आहे. त्यामुळे उद्या सोमवारी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील शॅक्‍समालक पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपका यांची भेट घेणार असल्याचे क्रूझ कार्दोझ यांनी सांगितले.

पर्यटनमंत्र्यांना लिहिले पत्र

शॅक्‍समालक कल्याण संस्थेने पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना पत्र लिहून कंत्राटदाराच्या अनियमिततेबाबत तक्रार देखील केली आहे. संस्थेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, वाहन बिघाड झाल्याची कारणे देत कंत्राटदार कचरा गोळा करत नाही. त्‍यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर अस्वच्छता पसरत असून, पर्यटनस्थळाची प्रतिमा खराब होत आहे. याच कचऱ्यामुळे पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर धोके निर्माण होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT