Students Dainik Gomantak
गोवा

Goa Education: सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना निकालाविनाच पुढील इयत्तेत प्रवेश; मुख्याध्यापकांच्या बैठकीत चित्र स्पष्ट

Goa Education Policy: सहावी ते नववीचे विद्यार्थी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होण्याआधीच ते पुढील वर्गात १ एप्रिलपासून बसणार आहेत.

Sameer Panditrao

Goa education policy annual exam student promotion

पणजी: सहावी ते नववीचे विद्यार्थी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होण्याआधीच ते पुढील वर्गात १ एप्रिलपासून बसणार आहेत. आज पर्वरी आणि मडगाव येथे घेण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत हे स्पष्ट झाले. नवे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी या बैठका घेतल्या.

पर्वरी येथे राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात आणि बड्डे-मडगाव येथील मल्टीपर्पज महाविद्यालयाच्या सभागृहात या बैठका झाल्या. पर्वरीतील बैठकीला शिक्षण संचालक शैलेश झिंगडे उपस्थित होते. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये दोन्ही बैठकांना उपस्थित होते.

नववीची परीक्षा मंडळ घेणार असल्याने तसेच काही विषय राहिल्यास त्या विषयाची परीक्षा दहावीत असतानाही देता येते, अशी तरतूद आहे. त्यामुळे नववीचा निकाल न लागताही दहावीच्या वर्गात बसता येते, असे आज स्पष्ट करण्यात आले.

शिक्षण परिषदेकडून ६ वी ते ८ वीपर्यंतच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका काढण्यात येतील. मात्र, उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन स्थानिक पातळीवरच केले पाहिजे, असेही या बैठकीत शंका निरसन करताना सांगण्यात आले. या बैठकीत मुख्याध्यापकांनी एप्रिलच्या अखेरीस होणाऱ्या ६ वी ते ९ वीच्या वार्षिक परीक्षांचा विषय उपस्थित केला.

या परीक्षा याआधीच निश्चित केल्याने त्यांचा निकाल लागण्याआधीच नवे शैक्षणिक वर्ष कसे सुरू करता येईल, अशी विचारणा मुख्याध्यापकांकडून करण्यात आली. त्यावर शिक्षण हक्क कायद्यानुसार ना नापास धोरण असल्याने ६ वी ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात निकालापूर्वी बसविण्यास काहीच हरकत नसल्याकडे मुख्याध्यापकांचे लक्ष वेधण्यात आले.

शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी समित्या

नव्या शैक्षणिक धोरणानुसार आंतर विद्याशाखेत व्यावसायिक शिक्षण देणारे विषय शिकविण्यासाठी शिक्षण खात्याकडून शिक्षक उपलब्ध नसल्यास तसे शिक्षक शिक्षण संचालनालयाकडून उपलब्ध केले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याची माहिती घेण्यासाठी तालुका पातळीवर समित्या नियुक्त करण्याचा निर्णयही बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT