Goa : Visit to Satre Village by Officers. Dainik Gomantak
गोवा

Goa : साट्रे भूस्खलनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

Goa : घटनास्‍थळांची पाहणी : अहवाल सरकार दरबारी सादर करणार

Mahesh Tandel, Padmakar Kelkar

वाळपई : नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील साट्रे गावातील (Satre Sattari Village) डोंगराळ भागात २२ जुलै रोजी मुसळधार पावसावेळी (Heavy Rain) मोठ्या प्रमाणावर भूस्खलन (Land Slindding) झाले होते. त्याबाबत सर्वप्रथम बातमी ‘दै. गोमन्तक’ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी साट्रे भागात जाऊन घटनेची पाहणी केली व भूस्खलन घटनेबाबत चिंता व्‍यक्‍त केली आहे. जंगल भागातून जाताना अधिकारी वर्गाला जळूंचाही सामाना करावा लागला आहे. हे जळू माणसांचे रक्त शोषून घेत असतात. त्यालाही सामोरे जावे लागले आहे.

आज रविवारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, सत्तरीचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, मामलेदार दशरथ गावस, संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर, वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस, जलसिंचन विभागाचे साहाय्यक अभियंता शैलेश पोकळे, श्री. शहा, मामलेदार कार्यालयाचे कर्मचारी मिलिंद म्हाळशेकर, सूर्यकांत राणे, रामकृष्ण गावस, चंद्रू सावंत आदींची उपस्थिती होती.

दीड तास चिखलमय
वाट तुडवत घटनास्‍थळी
सकाळी अकरा वाजता साट्रे गावातून मोहिमेला सुरवात झाली होती. जवळपास घटनास्थळी पोहोचण्यास दीड तासाचा अवधी लागला. जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्‍यासह अन्‍य अधिकाऱ्यांनी चिखलमय भागातून चालत जाऊन भूस्खलन घटनास्‍थळी पोहोचले. पाहणीवेळी कोसळलेला भाग दोन ते अडीच कि.मी. लांब असल्याचे निदर्शनास आले. हे भूस्खलन नेमके कशामुळे झाले, त्यासंबंधी तपास करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच सत्तरी तालुक्यात झर्मे, करमळी, करंझोळ आदी ठिकाणी अशाच घटना झाल्या असून तिथे काजूंचे नुकसान झाले आहे. त्यांचेही सखोल सर्वेक्षण करावे, असे सूचित केले.

करमळी बुद्रूक येथेही पाहणी
साट्रे नंतर करमळी बुद्रूक येथेही भूस्खनन भागाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. याबाबत अजित रॉय यांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेचा सविस्तर अहवाल सरकार दरबारी सादर केला जाणार आहे. ही घटना समोर येताच अनेक नागरिकांनीही घटनास्‍थळी जाऊन परिस्थिती प्रत्‍यक्ष बघितली. कोसळलेल्या भागात फिरणे अगदी कठीण असून चालताना बरीच कसरत करावी लागत आहे. मोठमोठ्या मातीचा ढिगारा, दगड धोंडे मोठ्या प्रमाणावर वाहून आले आहेत. कोसळलेली माती जवळील नदीतून वाहून गेली आहे. त्यामुळे म्हादईचे पाणी गढूळ झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT