Royla Fernandes | Goa News Dainik Gomantak
गोवा

Sal River: ग्रामस्थांनी आवाज उठवावा -रॉयला फर्नांडिस

Sal River: तीन वर्षांच्या आमच्या आंदोलनाला हळूहळू यश मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Sal River: साळ नदीची स्वच्छता मोहीम कित्येक वर्षांपासून राबवली जात आहे. साळ नदीमध्ये जे सांडपाणी किंवा कचरा जात असतो, त्याचे स्रोत वेर्णा औद्योगिक वसाहतीपासून सुरू होतात. तेव्हा वेर्णा, सुरावली, बाणावली, नावेली, मडगाव व नुवेच्या नागरिकांनी त्यासाठी एकत्रितपणे आवाज उठविला पाहिजे.

तसेच पश्र्चिम बगल रस्ता पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयाने केवळ एका वर्षाची अट घातल्याने हा रस्ता पूर्ण करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. शिवाय हा संपूर्ण रस्ता खांबावरच उभारला जाईल, असा विश्र्वास समाजसेविका आर्किटेक्ट रॉयला फर्नांडिस यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

गेल्या तीन वर्षांपासून पश्र्चिम बगल रस्ता खांबावर उभारावा, अशी बाणावलीवासीय मागणी करीत आहेत. आमची मागणी रास्त आहे. तीन वर्षांच्या आमच्या आंदोलनाला हळूहळू यश मिळत आहे.

त्यापासून अनेक गोष्टी आम्ही मिळवल्या आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे, शेत जमिनी सांभाळणे, हे आमचे कर्तव्य आहे, असेही राष्ट्रीय हरित लवादातील अर्जदार रॉयला फर्नांडिस यांनी सांगितले.

आम्ही सरकारवर विश्र्वास ठेवला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आमच्या मागण्या रास्त मार्गाने मांडल्या पाहिजेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी पाहणी केली आहे. ते आमची मागणी पूर्ण करतील, असा विश्र्वास आहे, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

Cutbona Jetty: 100 बोटी, 3000 लोक पण मूलभूत सोयी शून्य! कुटबण जेटीवर आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर, आमदारांनी दिला समस्या सोडवण्याचा शब्द

Bicholim Fish Price Hike: मान्सूनपूर्वी मासळीचे दर कडाडले! डिचोलीत ‘सुरमई’चा तोरा; मत्स्यखवय्यांच्या खिशाला कात्री

खरी कुजबुज: काँग्रेस आमदार कुणीकडे?

SCROLL FOR NEXT