Muddy water Dainik Gomantak
गोवा

Sanguem News: डोंगरावरून गावात चिखलमिश्रित पाणी! सुळकर्णे गावात भीतीचे वातावरण, कारण गुलदस्त्यात

सुळकर्णेतील प्रकार : नागरिकांत भीतीचे वातावरण, प्रशासनाकडून पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

Sanguem News सांगे तालुक्यातील सुळकर्णे गावात डोंगराळ भागातून एकाएकी मोठ्या प्रमाणात पाण्‍यासह चिखल, माती वाहून येऊ लागल्‍याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

27 जुलैपासून सुळकर्णे गावाला लागून असलेल्या डोंगराच्या खालच्या बाजूने चिखलमिश्रित पाणी नागरीवस्‍तीकडे येऊ लागले. यासंदर्भात माहिती मिळताच केपेचे मामलेदार, पोलिस निरीक्षक, अग्निशमन दलाच्‍या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

खनिज खंदकात भरलेले पाणी येत आहे का, याचीही पडताळणी करण्‍यात आली, पण तेथून पाणी येत नसल्याचे सिद्ध झाले. त्‍यानंतर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका जागेतून पाणी येत असल्याचे दिसून आले.

स्‍थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी रात्री अग्निशमन दलाचे जांबावलीकर तसेच केपे पोलिसांना बरोबर घेऊन सुळकर्णे गावाला भेट देऊन पाहणी केली. मोठ्या प्रमाणात पाणी गावात येत असल्याने त्यांनी या ठिकाणी पोलिस व आपत्ती व्यवस्थापनाला तैनात करण्यात यावे, अशी सूचना दिली.

पाण्‍याचा दाब वाढल्‍याचा परिणाम

केपेचे मामलेदार प्रताप गावकर तसेच खाण खात्याचे अधिकारी व भूगर्भतज्‍ज्ञ यांनी शुक्रवारी सकाळी गावाला भेट देऊन पाहणी केली असता या दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याचा दाब वाढल्याने माती, चिखलमिश्रित पाणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT