Digambar Kamat |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: साळ नदीच्या प्रदूषणाला दिगंबर कामतच जबाबदार

Goa News: गेल्या कित्येक वर्षांपासून साळ नदीच्या प्रदूषणासंदर्भात प्रश्र्न उपस्थित होतआहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: साळ नदीतील गाळ उपसण्यासाठी सुमारे २०० कोटीपेक्षा जास्त खर्च केला आहे. तरीही तेथे सुधारणा झालेली नाही. त्याविरोधात आम्ही निदर्शनेही केली. मात्र, त्याची दखल घेतली गेलेली नाही. कामत यांना केवळ गाळ उपसण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात रस आहे, अशी टीका कुतिन्हो यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून शॅडो कौन्सिल साळ नदीच्या प्रदूषणासंदर्भात प्रश्र्न उपस्थित करत आहे. कित्येक वर्षांपासून मडगाव शहर व आजुबाजुच्या गावांतील सांडपाणी या नदीत सोडले जाते.बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी दिगंबर कामत आणि गाळ उपसणारा कंत्राटदार यांच्यामध्ये नेमके काय संबंध आहेत, याचा शोध घ्यावा, असे आवाहन कुतिन्हो यांनी केले आहे.

साळ नदीत सांडपाणी सोडले जाते. ते बंद करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात मडगावच्या आमदारांना मुळीच रस नाही. जुलैमध्ये कामत आणि व्हिएगस यांनी साळ नदीची पाहणी केली होती. मात्र, आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत आमदार कामत यांनी कधीही साळ नदी प्रदूषित झाल्याचा उल्लेख केलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT