Chandrakant Gavas & Ruchika Katyal Dainik Gomantak
गोवा

Goa: 'मुरगाव बंदरात उतरणाऱ्या खलाशांना क्वारंटाईन राहण्याची गरज नाही'

कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार चौदा दिवस क्वारंटाईन (Quarantine) होण्याची अट मागे घेतली.

दैनिक गोमन्तक

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसच्या (Goa Chamber of Commerce and Industry) लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गावस (Chandrakant Gavas) यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कात्याल (Ruchika Katyal) यांनी मुरगाव बंदरात जहाजातून उतरणार्‍या कोविड निगेटिव्ह खलाशांना व अधिकाऱ्यांना कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार चौदा दिवस क्वारंटाईन (Quarantine) होण्याची अट मागे घेतली. याप्रकरणी संबंधित अधिकारी, खलाशी, शिपिंग एजंट यांनी समाधान व्यक्त केले.

मुरगाव बंदरात (Murgaon Port) मालवाहू जहाजातून उतरणाऱ्या अधिकारी व खलाशी यांना कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार 14 दिवस क्वारंटाईन राहण्याची अट एमपीटीच्या संबंधित विभागाने चालूच ठेवली होती. ज्यांच्याकडे वैद्यकीय तपासणी व कोविड अहवाल असला तरी त्यांना क्वारंटाईन राहण्याची सूचना करण्यात येत होती. त्यामुळे त्या अधिकारी व खलाशांना शहरातील कोणत्याही हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत होते. परंतु या चौदा दिवसांचा खर्च एजंटला सहन करावा लागत होता. कोविड निगेटिव्ह अहवाल असतानाही 14 दिवसापर्यंत घरी जाता येत नव्हते. त्यामुळे अधिकारी व संबंधित खलाशी नाराज होते. तसेच त्या एजंटना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने ते वैतागले होते.

याप्रकरणी चंद्रकांत गावस यांनी उपाध्यक्ष मनु ठक्कर यांच्यासह जिल्हाधिकारी रुचिका कात्याल यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रकरणाबद्दल निवेदन दिले. रुचिका कात्याल यांनी या प्रकरणी त्वरित दखल घेऊन सदर अट मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कोविड न अहवाल असलेल्या अधिकारी व खलाशी यांना ग उतरल्यावर थेट घरी जाण्यास मदत झाली फोटो जिल्हाधिकारी निगेटीव्ह अहवाल असलेल्या अधिकारी व खलाशी यांना जहाजावरून उतरल्यावर थेट धरी जाण्यास मदत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT