Govind Gaude, Ramesh Tawadkar, Sadanad Shet Tanawade
Govind Gaude, Ramesh Tawadkar, Sadanad Shet Tanawade  Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: गावडे-तवडकर वादावर तानावडेंचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा'...

Ganeshprasad Gogate

Govind Goude: मागील 2-3 दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या गावडे-तवडकर वादासंदर्भात नवनवीन अपडेट समोर येत आहेत. सध्या विधानसभेचे कामकाज सुरु असून विरोधक या वादाचा राजकीय फायदा उठवण्याच्या तयारीत असताना भाजपने मात्र यावर चांगलाच लगाम घातलाय.

हा वाद सुरु झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हा वाद अंतर्गत असल्याचे सांगून या प्रकरणावर काही प्रमाणात पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र विरोधक हा मुद्दा पुन्हा उकरून काढत असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आल्तिन्हो येथील शासकीय निवासस्थानी 5 फेब्रुवारीला सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, तवडकर आणि गावडे यांच्यात चर्चा झाली होती.

याच संदर्भात तानावडे यांनी महत्वाची माहिती समोर आणलीय.

गावडे-तवडकर वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकूण प्रकरणावर सखोल चर्चा झाली असून गावडेंना मी 'राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा' असे सांगितलेले नाही. ही चुकीची माहिती पसरली असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

दरम्यान भाजपमधील हे अंतर्गत वाद ऐन विधानसभा अधिवेशनाच्या काळात चव्हाट्यावर आल्याने विरोधकांना याचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरत चांगलेच शरसंधान साधले आहे.

''कला आणि संस्कृती खात्याने लुटलेला हा पैसा भाजपचा नसून करदात्यांचा आहे, हे त्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे हा भाजपचा अंतर्गत विषय ठरत नाही.

गावडेंनी राजीनामा द्यावा तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे,” अशी मागणी काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी केली होती.

काणकोण मतदारसंघातील 13 संस्थांना एकूण 26 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. हा निधी मिळालेल्या संस्थांनी कोणताही कार्यक्रम केलेला नाही.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचा यात हात असल्याचा आरोप खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, पंच जयेश गावकर यांच्यासह अन्य पंचांनी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सक्तीच्या नसबंदीला बळी पडलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारला आदेश

SCROLL FOR NEXT