Sacorda Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Sacorda Gramsabha: व्याघ्र प्रकल्प अधिसूचनेला प्रखर विरोध, ग्रामस्थांचे ठरावाला एकमताने समर्थन

ग्रामसभेत ठराव : लोकवस्तीला धोका असल्याचे कारण

गोमन्तक डिजिटल टीम

Sacorda Gramsabha म्हादई, नेत्रावळी अभयारण्ये व पश्चिम घाटात लोक पूर्वीपासून वास्तव्य करत आहेत. व्याघ्र संरक्षित क्षेत्रामुळे त्यांच्या जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यांच्यावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने साकोर्डा ग्रामसभेत व्याघ्र प्रकल्प अधिसूचनेला प्रखर विरोध करून ठराव संमत करण्यात आला.

व्याघ्र प्रकल्प अधिसूचनेचा ठराव माजी सरपंच माधवराव देसाई यांनी सभेत मांडला व उपस्थित ग्रामस्थांनी ठरावाला एकमताने समर्थन दिले. साकोर्डा पंचायत क्षेत्रात सुमारे २ हजार घरे आहेत. या घरांचे प्रत्येक ५ वर्षांनी नियमानुसार फेर सर्वेक्षण करण्यात येते.

गतवर्षी या घरांचे फेर सर्वेक्षण करून सुधारित कर लागू करण्यात येणार आहे. येत्या ६ महिन्यांत सर्व घरांचे फेर सर्वेक्षण करून ग्रामसभेत फेर सर्वेक्षणावर चर्चा करून सभेची मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर सुधारित कर लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपसरपंच शिरीष देसाई यांनी सभेत दिली.

ग्रामीण सौरऊर्जा योजनेअंतर्गत चंद्रावती नाईक, सुलोचना मावळींगकर यांच्या अर्जांना मान्यता देण्यात आली. सरपंच प्रिया खांडेपारकर, उपसरपंच शिरीष देसाई, पंच संजना नार्वेकर, महादेव शेटकर, जितेंद्र कालेकर, गायत्री मापारी, सोनू गावकर व निरीक्षक ट्विंकल मायणेकर सभेला उपस्थित होत्या. प्रिया खांडेपारकर यांनी स्वागत केले. शिरीष देसाई यांनी आभार मानले.

35 वर्षांपासून गढूळ पाणी

साकोर्डातील नळाला गेल्या 30-35 वर्षांपासून गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे ग्राहकांत संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांची जलवाहिनी असल्याने ती बदलावी, अशी मागणी प्रदीप वेरेकर यांनी केली. या समस्यांचे निवारण करण्यासाठी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठवले आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT