Beef Centre Goa Dainik Gomantak
गोवा

All Souls Day: ‘सोल्स डे’साठी गोव्यात बीफचा तुटवडा; कॅथलिक सामाजिक कार्यकर्त्यांचे सरकारला साकडे

कॅथलिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मिलाग्रीस फर्नांडिस यांनी याप्रकरणी सरकारला लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

Pramod Yadav

All Souls Day

पणजी: कॅथलिक समाजातील नागरिक पूर्वजांच्या स्मरणार्थ दरवर्षी ऑल सोल्स डे साजरा करतात. या सणासाठी बीफची मागणी असते. दरम्यान, या सणाच्या तोंडावर गोव्यात बीफचा तुटवडा निर्माण झाला असून, कॅथलिक समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारने यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

दरवर्षी ०२ नोव्हेंबर रोजी सर्वत्र ऑल सोल्स डे साजरा केला जातो. पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या मृत्यूस्थळी मेणबत्ती लावून प्रार्थना केली जाते. या सणासाठी बीफची मोठी मागणी असते. दरम्यान, सणाच्या तोंडावर राज्यात बीफचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कॅथलिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मिलाग्रीस फर्नांडिस यांनी याप्रकरणी सरकारला लक्ष घालण्याची विनंती केली आहे. कायदेशीर तपासणी करुन कॅथलिक समाजातील नागरिकांना सोल्स डेसाठी बीफ उपलब्ध करण्याची मागणी फर्नांडिस यांनी केली आहे. बीफ या सणासाठी महत्वाचा पदार्थ असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.

काय आहे ऑल सोल्स डे? (What is All Souls Day History/ Importance)

हयात नसलेल्या जवळच्या व्यक्तींना / नातेवाईकांना स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ऑल सोल्स डे. कॅथलिक समाजात या दिवसाला विशेष महत्व आहे. दरवर्षी ०२ नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.

या दिवशी मृत व्यक्तीच्या मृत्यूस्थळी त्याच्या स्मरणार्थ मेणबत्ती लावून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. पूर्वजांना स्मरण करण्याची कॅथलिक समाजातील ही जुनी प्रथा असल्याचे संदर्भ सापडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT