Goa news | Aires Rodrigues  Dainik Gomantak
गोवा

Goa news: 'अग्रवाल यांच्या गैरव्यवहारांची चौकशी करा'- आयरिश रॉड्रिग्‍ज

Goa news: गोवा प्रिंटिंग प्रेसचे निवृत्त संचालक एन. डी. अग्रवाल यांच्‍याविषयी काही आक्षेपार्ह मुद्दे आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa news: मुद्रण आणि छपाई मंत्री रोहन खंवटे यांनी सल्लागार म्हणून नियुक्त केलेले गोवा प्रिंटिंग प्रेसचे निवृत्त संचालक एन. डी. अग्रवाल यांच्‍याविषयी काही आक्षेपार्ह मुद्दे आहेत, त्‍यांचा सरकारने विचार करावा, अशी मागणी ‘आरटीआय’ कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्‍ज (Aires Rodrigues) यांनी केली आहे.

याबाबत जारी केलेल्‍या पत्रकात आयरिश यांनी म्‍हटले आहे की, अग्रवाल यांनी निवृत्तीच्या आधी 2013 मध्ये नारायणी पब्लिकेशनची स्थापना केली आणि गोवा सरकारची सर्व प्रकाशने छापली आणि Goakaido.com या वेबसाइटद्वारे प्रीमियमवर विक्री केली.

सरकारी मुद्रणालयात कोणतेही प्रकाशन उपलब्ध नसल्यास ते एन. डी. अग्रवाल यांच्या वेबसाइटवरून मागवले जाऊ शकते. गोवा Kaido.com आणि नारायणी पब्लिकेशन या दोन्हीचा पत्ता एकच आहे आणि तिथेच एन. डी. अग्रवाल राहतात. त्यांचा बंगला बांधण्यासाठी त्यांनी ती कोमुनिदादकडून जमीन कशी मिळवली ? त्यांनी मिळवलेली प्रचंड संपत्तीचीही चौकशी व्‍हायला हवी.

रॉड्रिग्‍ज यांनी म्‍हटले आहे की, प्रिंटिंग प्रेसमध्ये असताना त्यांनी सर्व फाईल्स कॉपी केल्या होत्या आणि ती प्रकाशने प्रकाशित करण्यासाठी ते वापरत आहेत का, याचा शोध घ्‍यावा. सरकारी मुद्रणालयाचा सल्लागार असूनही, ते त्या छापखान्याच्या प्रकाशनांच्या प्रती विकत आहेत आणि तेही राज्याला कोणतीही रॉयल्टी न देता, असाही आरोप आयरिश यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घर खरेदी करताय? सावधान! 'RERA'चा महत्त्वाचा निर्णय; कराराआधी अधिक रक्कम दिल्यास 'नुकसान भरपाई' नाही

Israel Attack: गाझावर इस्रायलचा क्रूर हल्ला; बॉम्बहल्ल्यात 70 जण ठार, मृतांमध्ये 7 निष्पाप चिमुकल्यांचाही समावेश Watch Video

West Bengal Landslide: दार्जिलिंगमध्ये पावसाचं रौद्ररूप! भूस्खलनाने हाहाकार; लोखंडी पूल कोसळला, अनेकांचा मृत्यू Watch Video

Rohit Sharma Tweet Viral: जर्सी नंबरचं कनेक्शन! शुभमन गिलकडे नेतृत्व येताच रोहितचं '13 वर्षांपूर्वीचं' ट्विट चर्चेत, म्हणाला होता...

Goa Crime: धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार, 47 वर्षीय आरोपीला अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT