Goa RSS | Sanquelim Dainik Gomantak
गोवा

Goa RSS: साखळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दसरा संचलन उत्साहात साजरा!

Goa RSS: यंदा साखळी येथे या संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Goa RSS: विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेले ''दसरा संचलन'' उत्साहात पार पडले. यंदा साखळी येथे या संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संचलन मिरवणुकीला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही या संचलनात उत्साहात सहभागी झाले होते.

साखळी येथील रवींद्र भवनाकडे संघाच्या ध्वजाला प्रणाम आणि प्रार्थना म्हटल्यानंतर या संचलनाला सुरुवात झाली. रवींद्र भवनाकडून गोकुळवाडामार्गे पुलाकडून बाजारातून श्री राधाकृष्ण मंदिराजवळ येताच संचलनाचा समारोप झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनिमित्त दरवर्षी विजयादशमीला डिचोलीत संचलन काढण्यात येते. यंदा प्रथमच साखळीत संचलन झाले.

विजयादशमीच्या शुभेच्छा: राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत हे संघाचे स्वयंसेवक. खाकी पॅन्ट, सफेद शर्ट आणि डोक्यावर टोपी असा संघाचा वेश परिधान आणि दंडुका घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या संचलन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

अन्य स्वयंसेवकांबरोबर त्यांनीही जवळपास पाऊणतास पायपीट केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संचलनाचे महत्त्व विषद करून सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT