Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Goa Accident Deaths: जानेवारी २०२५ ते जुलै २०२६ या १९ महिन्यांच्या काळात राज्यात रस्ते अपघातांत १,१०७ जणांचा मृत्यू झाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: जानेवारी २०२५ ते जुलै २०२६ या १९ महिन्यांच्या काळात राज्यात रस्ते अपघातांत १,१०७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातून या १९ महिन्यांत प्रतिदिवस सरासरी दोघेजण अपघातांचे बळी पडल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, ‘‘भाड्याने घेतलेली वाहने वापरणाऱ्यांकडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे?’’, असाही प्रश्न आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारला होता. त्यावर, ‘‘उत्तर आणि दक्षिण गोव्यातील पोलिस ठाणी त्यांच्या कार्यक्षेत्रात भाड्याने घेतलेल्या वाहनांचे सुरक्षित चालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना करत आहेत.

वाहन चालवण्याचा परवाना, वाहनाची कागदपत्रे आणि नव्या मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन तपासण्यासाठी नियमित नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवली जाते. बेपर्वा व निष्काळजीपणे, मद्यपान करून, अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असते, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

एकूण ८८३ अपघात

आमदार क्रूझ सिल्वा यांनी विधानसभा अधिवेशनात विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२५ ते जुलै २०२६ या १९ महिन्यांत राज्यातील विविध मार्गांवर एकूण ८८३ अपघात घडले. त्यात १,१०७ जणांचा मृत्यू झाला. शिवाय, या अपघातांत ३१ रेंट-अ-कार आणि रेंट-अ-बाईकचा समावेश आहे, असे आकडेवारीतून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT