Adv. Carlos Ferreira
Adv. Carlos Ferreira  Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: रस्ते अपघातांविषयी प्रशासन सुस्त; कॉंग्रेस आमदार फेरेरांचा सरकारला इशारा!

Ganeshprasad Gogate

Goa Road Accident: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातांमध्ये अनेकांचा बळी गेल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. विशेष म्हणजे या अपघातांतील काहीजण अवघे विशीतले तरुण आहेत.

राज्यातील या वाढत्या अपघातांविषयी विरोधकांसह जागृत नागरिकांनी चिंता व्यक्त केली सून विद्यमान सरकारने यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. राज्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटक 'रेंट अ कार' घेऊन गोव्यात फिरत असतात.

अशावेळी रस्त्यांचा अंदाज नसल्याने तसेच काहीवेळा अतिउत्सहीपणामुळे या कारचा अपघात होतो. याच संदर्भात कॉंग्रेस आमदार ॲड.कार्लुस फेरेरांनी सरकारला गंभीर इशारा दिलाय.

राज्यात रेंट अ कारमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या कारना स्पीड गव्हर्नर का बसवला जात नाही? सरकारचे संबंधीत खाते आणि यंत्रणांच कोणते सॅटींग सुरू आहे?

फक्त दंड वसुली न करता सरकारने वाढत्या अपघातांवर गंभीरपणे उपाय योजना न राबविल्यास आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा कॉंग्रेस आमदार ॲड.कार्लुस फेरेरांनी सरकारला दिलाय.

या विषयासंदर्भात काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक महत्वाची बाब समोर आणली होती. पर्यटकांनी वाहने चालवताना वाहतूक विभागाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

असे न केल्यास आणि यामुळे जीवघेणा अपघात झाल्यास रेंट-अ-बाईक/कारचा मालक आणि पर्यटकाला (चालकाला) अटक करण्यात येणार आहे. रेंट-अ-बाईक/कारचे वाढते अपघात लक्षात घेता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली होती.

राज्यात 2024 या नव्या वर्षात 35 जणांचे रस्ते अपघातांमध्ये बळी गेले आहेत. 1 ते 31 जानेवारीपर्यंत 20, तर 18 फेब्रुवारीपर्यंत 15 जणांचा अपघातांत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

एका बाजूने राज्य सरकार अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले, तरी दुसऱ्या बाजूने अपघातांची आणि त्यातील बळींची संख्या वाढतच चालली आहे.

यासाठी वेगाने वाहन चालवणे, निष्काळजीपणा यासारखे घटक कारणीभूत ठरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT