Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Goa: रिकार्डो यांनी सतवणूक करण्याऱ्यांची नावे जाहीर करावी- मायकल लोबो

कळंगुटचे (Calangute) आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

दैनिक गोमन्तक

सरकारी अधिकाऱ्याकडून (Government Officer) होत असलेल्या सतावणुकीमुळे आपण आपला करोडोंचा व्यवसाय विक्रीस काढल्याचा आरोप करण्यात आलेल्या हॉटेल व्यवसायिक रिकार्डो डिसौझा (Ricardo D'Souza) यांनी याबाबतीत संबंधित अधिकार्यांच्या  विरोधात लेखी तक्रार सादर करणे आवश्यक असून त्यानंतरच त्या अधिकार्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे कळंगुटचे (Calangute) आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

दरम्यान, रिकार्डो यांनी हवेत बार मारण्यापेक्षा पुराव्यासहित पुढे यावे असे आवाहन लोबो यांनी त्यांना केले. दरम्यान, त्यांच्या मालकीच्या प्रॉपर्टीचा अद्याप कुणाशीच विक्री करार झाला नसल्याची माहिती  मिळाल्याचे  मंत्री लोबो यांनी पुढे  बोलतांना सांगितले. जागतिक किर्तीचा ब्रेड असलेल्या टिटोची (Tito) एक्झीट राज्याला परवडणारी नसल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, रिकार्डो यांच्याकडून आरोप करण्यात आलेल्यांमध्ये राज्यातील नगर नियोजन प्राधीकरणाचा समावेश असून या प्राधिकरणाच्या चेअरमनपदी  सतत साडेसात वर्षे  मायकल लोबो कार्यरत होते यासंबंधात त्यांना छेडले  असतां आपल्या कारकिर्दीत नगर नियोजन प्राधिकरणाकडून रिकार्डो यांना एक सुद्धा नोटीस जारी करण्यात न आल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. तथापि, आपल्या नंतर संबंधितांकडून टिटो आस्थापनास नोटीस गेलेली असल्यास त्या गोष्टीचा निपक्षपातीपणे  तपास करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत कळंगुट मतदार संघातून रिकार्डो  डिसौझा कॉग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची तयारी करत होते त्यामुळे लोकांची सांत्वना मिळवीण्यासाठी त्यांनी हेतुपुरस्सर रचलेला बनाव नसावा कशावरून या गोष्टीवरून याभागातील लोकांत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे......

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT