पणजी: आमदार वीरेश बोरकर यांना पक्षातून निलंबित केलेले असतानाही ते पक्षाचे नाव आणि चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, असे ‘आरजी’चे नेते अजय खोलकर यांनी शनिवारी सांगितले.
पक्ष अजूनही आपल्याकडेच आहे. आपला पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असून आयोगाकडून येणारा सर्व पत्रव्यवहार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत आपल्या समितीकडे पोहोचवला जातो. तरीही आमदार वीरेश बोरकर स्वत:ला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेत आहेत, परंतु बोरकर यांना पक्षातून काढून टाकले असतानाही ते अजूनही बेकायदा पक्षाचे नाव आणि चिन्हाचा वापर करत आहेत. त्यांना लवकरच नोटीस पाठवली जाईल, असे खोलकर म्हणाले.
लवकरच अध्यक्ष
माजी अध्यक्ष मनोज परब यांनी पुन्हा आरजीत परतावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याबाबत आम्ही परब यांच्याशी चर्चाही करत आहोत. परब यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे निर्णय कोअर समितीच्या साहाय्याने आम्हीच घेत असून रिक्त असलेले आरजीचे अध्यक्षपद लवकरच भरून विधानसभा निवडणुकीची तयारी आम्ही सुरू करणार आहोत, असे खोलकर यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.