मंडळाच्या सर्वसाधारण सभेत यंदा गणपती किती दिवस पुजायचा, त्याबाबत चर्चा करण्यात आली.  Dainik Gomantak
गोवा

Goa: यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवावर येणार निर्बंध

मंडळाच्या सर्वसाधारण सभेत यंदा गणपती किती दिवस पुजायचा, त्याबाबत चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत दिड दिवस गणपती पूजण्यात यावा. असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

डिचोली: कोविड (Covid19) महामारीच्या संकटामुळे डिचोली (Bicholim) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवावर यंदाही निर्बंध (Restrictions on Ganeshotsav this year too) येणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. सद्यस्थितीत यंदा दिड दिवस गणपती पूजण्याचा विचार पुढे आला आहे. तरीदेखील चतुर्थीपर्यंतची महामारीची स्थिती आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करूनच गणपती किती दिवस पुजायचा, त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

मंडळाच्या सर्वसाधारण सभेत यंदा गणपती किती दिवस पुजायचा, त्याबाबत चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत दिड दिवस गणपती पूजण्यात यावा. असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले. लवकरच कार्यकारी समितीची एक बैठक घेवून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. डिचोलीत दरवर्षी अकरा दिवस सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्यात येत असला, तरी 'कोविड' संकटामुळे मागील वर्षांपासून डिचोलीत गणेशोत्सवावर निर्बंध आले आहेत. मागील वर्षी पाच दिवसांचा गणपती साजरा करण्यात आला होता.

कार्यकारी समितीची निवड

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा शनिवारी (ता.18) सायंकाळी येथील नवीन मार्केट संकुलातील सभागृहात मावळते अध्यक्ष मकरंद तेली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मावळते सचिव सत्यवान हरमलकर यांनी सभेत इतिवृत्त सादर केले. मावळते खजिनदार दिलीप धारगळकर यांनी मागील वर्षीचा जमाखर्च मांडला. त्यावर बराचवेळ चर्चा झाल्यानंतर जमाखर्चाला मान्यता देण्यात आली. तद्नंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नवीन कार्यकारी समिती निवडण्यात आली. श्याम मातोणकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेली सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष-दत्तगुरु अमोणकर, शहाजी शिवले पाटील, रमेश डिचोलकर आणि अर्जुन मळगावकर. सचिव- विठ्ठल वेर्णेकर, खजिनदार-नरेश कडकडे, कार्यक्रम प्रमुख-सत्यवान हरमलकर आणि लॉटरी प्रमुख-नितीन कुंभारजुवेकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT