Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Fake Resort Booking: गोव्यात रिसॉर्ट बुक करताय? थांबा! अगोदर ही बातमी वाचा, होऊ शकते आर्थिक फसवणूक

Goa resort booking fraud: पर्यटक संबधित रिसॉर्टच्या ठिकाणी गेले असता त्याठिकाणी बुकिंग नोंद झाल्याची माहिती उघडकीस आली.

Pramod Yadav

पणजी: देशात डिजिटल क्रांतीसह सायबर गुन्ह्यांचे जाळे गडद होताना दिसत आहे. रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली अनेकजण सायबर घोटाळ्यांना बळी पडत आहेत. गोव्यात अलिकडेच रिसॉर्टच्या बनावट संकेतस्थळावरुन ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पर्यटकांचे आर्थिक नुकसान झालेच शिवाय त्यांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागला.

रिवा बीच रिसॉर्टच्या नावाने एक बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आले. यावरुन ग्राहकांकडून बनावट बुकिंग करुन पैसे घेण्यात आले. दरम्यान, पर्यटक संबधित रिसॉर्टच्या ठिकाणी गेले असता त्याठिकाणी बुकिंग नोंद झाल्याची माहिती उघडकीस आली. सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर रिसॉर्ट व्यवस्थापनाने ऑनलाईन तपासणी केली असता रिसॉर्टच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार केल्याचे लक्षात आले.

रिसॉर्ट व्यवस्थापनाने याप्रकरणी सायबर पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. अज्ञात आरोपीने रिसॉर्टच्या बनावट संकेतस्थळावरुन बुकिंग घेऊन ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ग्राहकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने सायबर चोरटे विविध रिसॉर्ट, हॉटेलची बनावट संकेतस्थळ निर्माण करुन त्यावरुन बुकिंग घेतात. दरम्यान, ग्राहक बुकिंग केले आहे या विचाराने संबधित रिसॉर्टमध्ये येतात त्यावेळी बुकिंग झाले नसल्याचे उघडकीस येते किंवा असे काही रिसॉर्ट किंवा हॉटेल अस्तित्वात नसल्याचे उघडकीस येते. ग्राहकांचे यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय मनस्ताप देखील सहन करावा लागतो.

याबाबत गोवा पोलिसांच्या सायबर शाखेने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रिसॉर्ट किंवा हॉटेल बुकिंग करताना अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल क्रमांकाची खातरजमा केल्याशिवाय बुकिंग न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

50 ओव्हरची मॅच, 35 धावा, 10 विकेट्स! वनडे क्रिकेटमधील सर्वात 'लाजिरवाणा' रेकॉर्ड; नेपाळ अन् श्रीलंकेच्या गोलंदाजांनी रचला इतिहास

SCROLL FOR NEXT