Goa HSE Board Exam 
गोवा

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa HSE Board Exam Time Table: विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेच्या तयारीला पुरेसा वेळ मिळावा यासाठी मंडळाने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pramod Yadav

Goa HSE Board Exam Time Table

पणजी: बारावी २०२५ च्या अंतिम परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.

जेईई प्रवेश परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची तारीख ०१ फेब्रुवारीवरुन १० फेब्रुवारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बदलाची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जेईई प्रवेश परीक्षा आणि बारावी बोर्डाची परीक्षा यांच्या तारखांचा एकाचवेळी येऊ नयेत यासाठी पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या परीक्षेची तारीख बदलण्यात आलीय. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीच्या वतीने जेईई परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केली नाही. पण, त्यापूर्वीच मंडळाने ०१ फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा १० तारखेला ढकलली आहे.

विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेच्या तयारीला पुरेसा वेळ मिळावा यासाठी मंडळाने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जेईई २०२५ जानेवारीच्या अखेरीस संपण्याची शक्यता आहे. याचा विचार करुनच मंडळाने परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळणार आहे.

मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकाची माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.gbshse.in) पाहता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT