GST Rates Increases Dainik Gomantak
गोवा

GST Collection In Goa: राज्याच्या जीएसटी संकलनात 36 टक्क्यांनी वाढ

देशाचे जीएसटी संकलन 1.59 लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याच्या वार्षिक जीएसटी संकलनात 36 टक्के वाढ झाली आहे. 2022 वर्षातील जीएसटी करवसुलीचे आजवरचे सर्व विक्रम मोडत, नवा उच्चांक गाठला आहे.

गोवा राज्याने ऑगस्ट 2023 मध्ये तब्बल 509 कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पीआयबीने आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली.

मागच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये हेच संकलन 376 कोटी रुपये इतके होते. केंद्रीय अर्थ खात्याने ही माहिती जाहीर केली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये जीएसटी संकलन 509 कोटी रुपये, एसजीएसटी 174 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

देशाचा विचार केल्यास ऑगस्ट महिन्यात सलग आठव्या महिन्यात जीएसटी संकलन 1.59 लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. यामध्ये सीजीएसटीचा 28,328 कोटी रुपये, एसजीएसटीचा 35,794 कोटी रुपये, आयजीएसटी 83,251 कोटी रुपये आणि उपकराच्या माध्यमातून 11,695 कोटी रूपये महसूल प्राप्त झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT