पणजी: सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रेशन न घेणाऱ्यांची रेशनकार्डे तात्पुरती निलंबित करण्याची प्रक्रिया येत्या रविवारपासून (ता. २५) सुरू होणार आहे. ज्या लाभार्थ्यांची रेशनकार्डे निलंबित होतील, त्यांना तीन महिन्यांच्या आत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर त्यांची रेशनकार्डे पुन्हा सक्रिय केली जातील, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे सहाय्यक संचालक विजयकुमार जमादार यांनी बुधवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक —आता एकाच ॲपमध्ये!
रेशनचा लाभ मिळत असूनही सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रेशन न घेणाऱ्या लाभार्थ्यांची रेशनकार्डे तात्पुरती निलंबित करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतला होता. यासंदर्भातील आदेशही सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर नागरी पुरवठा खात्याने सहा महिने रेशन न घेणाऱ्यांची रेशनकार्डे तात्पुरती निलंबित करण्यात येतील, अशी सार्वजनिक सूचना जारी केली होती.
प्रत्येक महिन्याला होणार नोंद
रेशनचा नियमित लाभ न घेणाऱ्या कार्डधारकांची संख्या कमी करण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यांपासून रेशन न घेतलेल्या कार्डधारकांची दर महिन्याला नोंद घेऊन त्यांच्या रेशनकार्डांबाबत नियमानुसार निर्णय घेतला जाणार आहे, असेही विजयकुमार जमादार यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.