Covid 19 Dainik Gomantak
गोवा

Goa Covid 19: ‘कोविड’च्या मृत्यूदरात देशात गोवा तिसरा

जून महिना गोव्याला (Goa) दिलासा देणारा महिना ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: देशात ‘कोरोना’मुळे होणाऱ्या मत्यूदरात गोवा तिसरा आहे. जाहीर झालेल्या आकाडेवारीनुसार, केरळ 0.4 टक्के, दिल्ली 1.7 टक्के, गोवा 1.8 टक्के, महाराष्ट्र 1.9 टक्के व पंजाब 2.7 टक्के आहे. गोवा हा देशातील 100 टक्के कोरोना मृत्यू नोंद व मृत्यू प्रमाणित करणारे राज्य आहे. इतर राज्यांपैकी केरळमध्ये 100 टक्के मृत्यू नोंद झाली. (Goa ranks third in Covid19 death rate in Country)

आरोग्य खात्याने आज (बुधवारी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 240 कोरोनाबाधित झाले. तर 201 कोरोनाबाधित बरे झाले. नव्या कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दोन महिन्यांत आज पहिल्यांदा कमी झाली. आज दिवसभरात 4206 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहीर केलेल्या अहवालानुसार, आज 6 कोरोना बाधितांचे निधन झाले. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3054 झाली आहे. गोव्यात 2274 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. बरे होण्याची टक्केवारी 96.80 वर आहे.

जून महिना दिलासादायक

जून महिना गोव्याला दिलासा देणारा महिना ठरला आहे. कारण मे महिन्यात 64614 लोक कोरोनाबाधित झाले. त्यातील 1481 दगावले. तर जून महिन्यात 11023 लोक कोरोना बाधित झाले व 327 कोरोनाबाधित दगावले. राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 2274 वर पोचली असून, नव्याने कोरोना झालेल्यांची संख्याही कमी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT