Ramesh Tawadkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar: ...तर आदिवासींना आरक्षणाची गरज नाही !

सभापती तवडकर : वनहक्क सनदा व अन्य योजनांचा लाभ लाभार्थींना वितरित

गोमन्तक डिजिटल टीम

Ramesh Tawadkar राज्यातील कृषी क्षेत्रात आदिवासी समाजाने दिलेले योगदान कुणीही विसरू शकणार नाही. कृषीधन वाढीसोबत स्वतःबरोबरच इतरांनाही खाऊ घालण्याची संस्कृती आदिवासी समाजाने जपली आहे.

त्यासाठी आदिवासींचे अस्तित्व जपण्याबरोबरच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याची आवश्‍यकता आहे. तसे झाले तर कोणत्याही आरक्षणाची समाजाला गरजच उरणार नाही, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

येथील राजीव गांधी कला मंदिरात गुरुवारी आदिवासी कल्याण खाते तसेच आदिवासी आर्थिक विकास महामंडळ, आदिवासी संशोधन इन्स्टिट्यूटतर्फे वनहक्क दाव्यांच्या सनदा व अन्य योजनांचा लाभार्थींना लाभाचे वितरण कार्यक्रमात तवडकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, माजी मंत्री प्रकाश वेळीप, आदिवासी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, गोवा एससीएसटी आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर, आदिवासी संशोधन इन्स्टिट्यूटचे संचालक शंकर गावकर व उपजिल्हाधिकारी दीपक देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.

रमेश तवडकर म्हणाले की, आदिवासींच्या उत्कर्षासाठी एक व्हीजन'' बाळगण्याची गरज आहे, ‘रोडमॅप'' तयार करण्याची आवश्‍यकता आहे. सर्वांनी संघटित प्रयत्न केले तर आरक्षणासारखा विषय गौण ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, आदिवासी तरुण आज नकारात्मकतेत भरकटला आहे. इतरांकडे नोकरी करण्यापेक्षा दुसऱ्याला नोकरी देण्याची धमक आणि ताकद आदिवासी युवकांनी बाळगावी.

त्या दृष्टीने कार्यरत व्हावे. नावीन्य घडवण्याची आज गरज आहे आणि त्यासाठी संघटित प्रयत्न निश्‍चितच आश्‍वासक ठरतील, असे ते म्हणाले.

वासुदेव मेंग गावकर यांनी आदिवासींच्या उत्कर्षासाठी संघटित प्रयत्न करताना पर्वरीतील आदिवासी भवनाची संकल्पना साकारणासाठी एकत्रित प्रयत्न करुया, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT