Sadanand Shet Tanawade Dainik Gomantak
गोवा

Goa Rajyasabha Election 2023 : सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

सोपस्कार पूर्ण : आज मिळणार खासदारकीचे प्रमाणपत्र

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rajyasabha Election 2023 : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. या निवडणुकीसाठी तानावडे यांनी ११ जुलै रोजी अर्ज दाखल केला होता. त्यादिवशीच विरोधी पक्षांनी गोव्यातून राज्यसभेसाठी उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे तानावडे यांची निवड निश्चित होती.

सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत तानावडे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने या संबंधित सर्व तपशील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला.

त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या खासदारकीचे प्रमाणपत्र उद्या मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता विधानसभा मुख्य सचिव नम्रता उलमन यांच्या कार्यालयात प्रदान करण्यात येईल.

सत्काराची तयारी

तानावडे यांना विधानसभेत राज्यसभा निवडणूक अधिकारी तथा विधानसभा सचिव नम्रता उलमन यांच्या कार्यालयात खासदार प्रमाणपत्र देण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत.

तिथे त्यांचा छोटीखानी सत्कार करण्यात येणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरमध्ये भव्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार आयोजित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT