Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: धारबांदोडा, सांगे, वाळपई केंद्रावर पावसाचे शतक! राज्यात जुलै महिन्यात 46 इंच पावसाची नोंद

Goa Monsoon: धारबांदोडा, सांगे आणि वाळपई केंद्रावर पावसाने इंचाचे शतक पार केले आहे. त्यासोबतच राज्यातील सर्व केंद्रांवर आत्ता किमान ५० इंचाहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत १९८२.३ मि.मी. म्हणजेच ७८.०४ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात ११८९ मि.मी. म्हणजेच ४६.८ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. जुलैमध्य पडणाऱ्या सर्वसामान्य पावसाच्या तुलनेत १३.६ टक्के अधिक आहे.

धारबांदोडा, सांगे आणि वाळपई केंद्रावर पावसाने इंचाचे शतक पार केले आहे. त्यासोबतच राज्यातील सर्व केंद्रांवर आत्ता किमान ५० इंचाहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात पुढील चार दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

जून महिन्यात राज्यात पावसाचा तुटवडा नोंदविण्यात आला होता, परंतु आता सरासरी ७८.०४ इंच पाऊस राज्यात झालेला आहे. जुलैमध्ये कधी जोरदार तर कधी मध्यम व काही दिवस कडकडीत उन्हाचे गेले. पाऊस हा प्रामुख्याने १ जुलै ते ७ जुलै आणि १५ जुलै ते २६ जुलै या कालावधीत बरसला. यंदा जुलैमध्ये एका दिवसात सर्वाधिक ६.३ इंच पावसाची नोंद ३ जुलै रोजी झाली.

शंभर इंच पाऊस!

तसे पाहता यंदा राज्यात २५ मे रोजी मॉन्सूनचे आगमन झाले. त्यामुळे मे, जून आणि जुलैमधील पाऊस धरला तर एकूण १०० इंच पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्यात पावसाने शंभर इंचाचा टप्पा गाठला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पाच वर्षांतील जुलैमधील पाऊस

वर्ष मि.मी. इंचात

२०२१ १२८१ ५०.४३

२०२२ ११८७ ४६.७३

२०२३ १८३१ ७२.०८

२०२४ २०१३ ७९.२५

२०२५ ११८९ ४६.८१

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT