Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Updates: गोव्यात 27 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता! येलो अलर्ट जारी

मॉन्सून परतून बरेच दिवस उलटून गेले असले तरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे.

Kavya Powar

Goa Rain Updates: मॉन्सून परतून बरेच दिवस उलटून गेले असले तरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

माहितीनुसार, 1 ऑक्टोबरपासून आजअखेर 9.10 इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावेळी सरासरी 20 टक्के अधिक पाऊस झाला.

राज्यात पेडणे, सत्तरी आणि तिसवाडी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी शुक्रवारी रात्री ढगांच्या प्रचंड गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. सुमारे एक तास जोरदार पावसाने झोडपले. पेडण्यात रात्री पावसाचा जोर कमी झाला असला, तरी ढगांच्या गडगडाटासह पहाटे तीन वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही पावसाने एंट्री केली आणि सर्वांची धावपळ सुरू झाली. इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट पाहण्यासाठी जगभरातील सिनेरसिकांंनी हजेरी लावली आहे. यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर सर्वजण आडोसा शोधू लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT