Goa Rain  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: निसर्गाच्या त्रिवेणी संगमाची सांगेवासीयांना अनुभूती!

Goa Rain: गोव्यात निसर्ग चक्र बदलले असून सकाळी ऊन, संध्याकाळी जोरदार पाऊस अन् पहाटे गडद धुके पडू लागले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Rain: निसर्ग चक्र बदलले असून सकाळी ऊन, संध्याकाळी जोरदार पाऊस अन् पहाटे गडद धुके पडू लागल्याने तिन्ही ऋतू एकाचवेळी अनुभवायचा योग सध्या सांगेवासीयांना आला आहे. गेले पाच सहा दिवस रोज संध्याकाळी गडगडाटासह पाऊस पडतो. पहाटेपासून सकाळपर्यंत धुके पडते आणि दुपारपर्यंत कडक ऊन असते. असा निसर्गाचा त्रिवेणी संगम सांगेवासीयांना अनुभवायला मिळत आहे.

वास्तविक परतीचा पाऊस सुरू झाल्याचे चित्र निर्माण झालेले असताना पडणारा पाऊस (Rain) मृग नक्षत्राप्रमाणे बरसू लागला आहे. दिवाळी जवळ येताच पाऊस कमी होऊन गुलाबी थंडीची चाहूल लागत असते, पण सध्याची स्थिती पाहता विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पडणारा पाऊस बळीराजाला मारक आहे.

उभे पीक आडवे पडून पावसाचे पाणी शेतात साचल्यास धान्य कुजून जाण्याची भीती अधिक असते. गेल्या वर्षी असेच वातावरण निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. सकाळी धुके, दुपारी उन्ह आणि संध्याकाळी जोरदार पाऊस अशी स्थिती याआधी कधीच नव्हती. निसर्गाचा समतोल ढासळल्याने सध्याची ही स्थिती निर्माण झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे.

पिकांचे नुकसान

कष्टकरी समाज चार पैसे मिळावे म्हणून आपल्या परसबागेत झेंडूची लागवड करतात. त्याचा फायदा दिवाळी (Diwali) सणाला होत असतो, पण असा पाऊस दररोज पडू लागल्यास फुले कुजून नासाडी होत असते. परिणाम म्हणून हातात चार पैसे पडण्याआधीच परिश्रम वाया गेलेले असतात. यंदा चतुर्थी सणाला पडलेल्या पावसाने कष्टकरी समाजाची काकडी, चिबूड, दोडकी यासारख्या पिकांची हानी झाली. एकूणच हा पाऊस नुकसान करणारा ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT