Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update : गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

रविवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे काही दिवस उष्माही वाढला होता. मात्र, रविवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

हवामान खात्याने रविवारी राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने गेल्या चार दिवसांत राज्यात अवघा 10 मि.मी.पेक्षाही कमी पाऊस पडला. त्यामुळे महिनाभरानंतर गोवा राज्यात सूर्याचे दर्शन झाले. त्यासोबत काही प्रमाणात तापमानातही वाढ झाली. गेल्या 24 तासांत राज्यात 4.3 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर आजपर्यंत एकूण 1,981 मि.मी. पावसाची नोंद झाली, जी सरासरी पावसाच्या तुलनेत 16.6 टक्के अधिक आहे.

पणजी येथे शनिवारी कमाल 30.4 अंश सेल्सिअस तर किमान 25.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारी रात्री राजधानी पणजीसह राज्याच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काही ठिकाणी किरकोळ पडझडही झाली. रविवारी पुन्हा यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, रविवार सुटीचा दिवस असल्याने जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT