bus driver Dainik Gomantak
गोवा

आसगाव-बार्देश येथील रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? बसचालकांचा संताप; प्रशासनाला दिली 'वॉर्निंग'

Goa Rain: राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र सततच्या पावसामुळे राज्यातील रस्त्यांची पुरती दुरावस्था झाली आहे.

Manish Jadhav

राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र सततच्या पावसामुळे राज्यातील रस्त्यांची पुरती दुरावस्था झाली आहे. वाहनचालकांसह प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना कराावा लागत आहे. याचदरम्यान आसगाव बार्देश येथील बस मालक शाम गोवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्यांच्या दुर्दशेबाबत रोष व्यक्त केला. रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्यावर ठाण मांडून प्रशासनाचे रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष्य वेधण्यासाठी आंदोलन केले. रस्त्यांवरील खड्डे आणि दुरुस्तीच्या अभावामुळे अपघातांमध्ये वाढ झाल्याचे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, गोवेकर यांनी थेट प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला, ज्यामध्ये त्यांनी रस्त्यांची डागडूजी करण्याची मागणी केली. जर या आठ दिवसांत प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती केली नाही, तर त्यांनी पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला. गोवेकर यांचा हा निषेध प्रशासनाला जागे करण्यासाठी आहे, जेणेकरुन रस्त्यांची स्थिती सुधारली जाऊ शकेल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी मिळू शकेल.

दुसरीकडे, गोवेकर यांच्या या आंदोलनामुळे स्थानिक रहिवाशांमध्येही जागरुकता निर्माण झाली आहे आणि त्यांनी या मुद्द्यावर त्यांचे समर्थन व्यक्त केले आहे. प्रशासनाने त्वरित पाऊल उचलून रस्त्यांच्या डागडूजीसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: 'लग्न नको'! मडगावातील मुलगी सापडली कोल्हापूरात; विवाहाच्या तगाद्यामुळे घरातून काढला पळ

Goa Politics: खरी कुजबुज; बिबट्यालाही राहायला फ्लॅट हवा!

Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोटींच्या नावावरून गोंधळ! स्थानिक नद्यांची नावे देता आली नाहीत का? अमित पाटकर यांचा सवाल

Panaji: पणजीतील जिवंत माणसाला दाखवले 'मृत'! वीज खात्याचा भोंगळ कारभार; मंत्री ढवळीकर देणार स्पष्टीकरण

Cuncolim Revolt: 442 वर्षांपूर्वी परकीय सत्तेच्‍या विरोधात कुंकळ्‍ळीच्‍या 16 महानायकांनी दिलेला लढा आशिया खंडातील 'पहिला उठाव'

SCROLL FOR NEXT