Goa Railway Dainik Gomantak
गोवा

Goa Railway : वीर-खेड स्थानकांदरम्यान 7 जुलै ला मेगा ब्लॉक

काही देखभालीचे काम करण्याचे निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Railway : वीर ते खेड रेल्वे स्थानकांदरम्यान काही देखभालीचे काम करण्याचे असल्याने ७ जुलै रोजी दुपारी १२.२० पासून ३.२० वाजेपर्यंत तीन तास मेगा ब्लॉक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून त्यामुळे काही प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

पोरबंदर ते कोचुवेली दरम्यानची २०९१० ही गाडी जी ६ जुलै रोजी सुटणार आहे ती रोहा ते वीर स्थानकादरम्यान दीड तासांसाठी थांबवली जाईल. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिरूवनंतपुरम मार्गावरील १६३४५ ही गाडी जी ७ जुलै रोजी सुटणार आहे, ती रोहा ते वीर स्थानकांदरम्यान ३५ मिनिटांसाठी थांबवली जाईल.

सावंतवाडी ते दिवा दरम्यानची १०१०६ ही रेल्वे जी ७ जुलै रोजी सुटणार आहे, ती दीड तासासाठी रत्नागिरी ते खेड दरम्यान थांबवली जाईल. थिरूवनंतपुरम ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस १२४३१ ही गाडी, जिचा प्रवास ६ जुलै रोजी सुरु होणार आहे, ती रत्नागिरी ते खेड दरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवली जाईल. प्रवाशांनी या परिणामाची दखल घ्यावी तसेच तसेच गैरसोयीबद्दल प्रवाशांची दिलगिरी रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT