Rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्यात 2024 पर्यंत 'हर घर फायबर'-रोहन खंवटे

Goa News: केपे तालुका भेटीवेळी नागरिकांना ग्वाही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

ज्याप्रमाणे घराघरांत नळ व वीज जोडणी दिली जाते, त्याप्रमाणे ज्या लोकांना इंटरनेट सुविधा पाहिजे, त्यांना 2024 पर्यंत ‘हर घर फायबर’ या योजनेतून ती पुरवली जाईल, अशी ग्वाही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. ‘मंत्री तुमच्या दारी’ कार्यक्रमांतर्गत केपे तालुक्याच्या भेटीवर आले असता त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी आमदार बाबू कवळेकर आणि मान्यवर उपस्थित होते. इंटरनेट सुविधा राज्यातील सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. मात्र, सध्या लोकांना इंटरनेट सुविधा पाहिजे; पण टॉवर नको, अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी खंतही खंवटे यांनी व्यक्त केली.

इको पर्यटनावर भर

गोवा राज्य पर्यटनस्थळ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पण ही ओळख फक्त समुद्र किनाऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता गोव्यातील कानाकोपऱ्यात जाऊन इको पर्यटनावर भर दिला पाहिजे. गोवा हे 365 दिवसांसाठी पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जावे, यासाठी आता पावसाळ्यातही पर्यटक राज्यात येण्यासाठी सोयीसुविधा निर्माण करणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.

मंदिरांचे सुशोभीकरण

केपे तालुक्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. केपे तालुक्यात बेतुल येथील किल्ला, कुंकळ्ळी येथील शांतादुर्गा फातर्पेकरीण आणि शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिर, बार्शे, मोरपिर्ला येथील मंदिरांचे सुशोभीकरण, कुडचडे येथील नंदा तळे आणि काकोडा येथील महादेव देवस्थानचे सुशोभीकरण करणार असल्याची माहिती खंवटे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT