Bull Dainik Gomantak
गोवा

Quepem News: गुरांची बेकायदेशीर वाहतूक; दोघांना अटकेत

Quepem News: चारही बैल बाणावली येथून आणले असून कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे बेपारी यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem News: असोल्डा केपे येथे बेकायदेशीर रित्या गुरांना घेऊन जाणारा रिक्षा स्थानिकांनी अडवून महंमद सादिक बेपारी (42) व लियाकत बेपारी (47) यांना केपे पोलिसांच्या स्वाधीन केले. आज त्यांना न्यायालयात उभे केले असता जामिनावर सोडून देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार काल दिं. 26 रोजी रात्रौ एका रिक्षात चार बैल घेऊन चांदरहुन कुडचडे मार्गे जात असल्याचे स्थानिक युवकांनी पाहिले असता सदर रिक्षा अडवून याची माहिती कुडचडे व शेल्डे येथील युवकांना दिली.

सदर युवकांनी रिक्षातून बैलांना घेऊन जाणाऱ्या महंमद व सादिक यांना सदर बैल कुठे घेऊन जात आहे असा प्रश्न केला असता त्यांनी चारही बैल बाणावली येथून आणले असून कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.

यावेळी स्थानिकांनी याची माहिती केपे पोलिसांना दिली. केपे पोलिसांनी घटनास्थळी येऊन महंमद व लियाकत तसेच रिक्षा केपे पोलीस स्थानकात आणली.

आज दि.27 रोजी त्यांना केपे न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका केली असून जप्त करण्यात आलेले चारही बैल ध्यान फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आले असून केपे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT