Porvorim Elevated Corridor  Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: पर्वरी उड्डाण पूलाचं काम सुरुच राहणार, काम थांबण्याबाबत कोणतीही सूचना नाही; अधिकाऱ्याचा खुलासा

Porvorim Elevated Corridor: पूलाचे काम थांबविण्याबाबत मंत्र्यांकडून कोणतीही सूचना मिळाली नसल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता जुड कार्व्हालो यांनी केला आहे.

Manish Jadhav

पणजी ते म्हापसा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सांगोल्डा जंक्शन ते पर्वरीदरम्यान साडेपाच किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल (एलिव्हेटेड कॉरिडॉर) उभारला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी या पूलाच्या बांधकामासंदर्भात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन समान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची खातरजमा केल्यानंतर काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

मंत्री खंवटे यांनी यावेळी कंत्राटदार आणि प्रशासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे म्हटले होते. उड्डाण पूलाच्या आराखड्याचे सादरीकरण केल्यानंतर बांधकामाला सुरवात करावी, अशी सूचना त्यांनी कंत्राटदाराला केली होती.

वाहतूक व्यवस्थापन इतर बाबींचा विचार न करताच, कंत्राटदाराने पुलाचे काम सुरु केल्याने स्थानिकांमध्ये रोष असल्याचे खंवटे यांनी नमूद केले होते.

दरम्यान, पूलाचे काम थांबविण्याबाबत मंत्र्यांकडून कोणतीही सूचना मिळाली नसल्याचा खुलासा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता जुड कार्व्हालो यांनी केला आहे.

कामाबाबत काही तांत्रिक आव्हाने आहेत, परंतु काम सुरु आहे. कंत्राटदारांकडे पूलाचा संपूर्ण प्लॅन आहे आणि लवकरच प्रत्यक्षात काम सुरु होईल अशी अपेक्षा आहे, असेही कार्व्हालो म्हणाले.

पर्वरीमध्ये सुरु असलेल्या उड्डाण पूलाचे काम कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु राहणार असल्याचे कार्व्हालो यांनी सांगितले. कंत्राटदारांनी काही आठवड्यांपूर्वी वाहतूक विभागाकडे वाहतूक नियोजनाबाबत प्रस्ताव दिला असून, त्यांच्याकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

पर्यटन मंत्री रोहन खवंटे (Rohan Khaunte) यांनी काही दिवसांपूर्वी पर्वरी उड्डाण पुलाबाबत कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि इतर संबधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. खवंटे यांनी यावेळी वाहतूक नियोजनाबाबत चिंता व्यक्त केली. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही असे नियोजन करण्याबाबत त्यांनी सूचना केली होती.

सांगोल्डा जंक्शन ते हॉटेल निओ मॅजेस्टिकपर्यंतच्या साडेपाच किमी लांबीच्या सहापदरी उड्डाण पुलाचे काम एप्रिलच्या मध्यात सुरु झाले. येत्या 24 महिन्यांत एप्रिल 2026 पर्यंत पर्वरी उड्डाण पूल पूर्ण होणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT