Public Works Department Dainik Gomantak
गोवा

Public Works Department: गोवा साबांखाच्या '70' अभियंत्यासह तांत्रिक साहाय्यकांना पदोन्नती

Public Works Department: गोवा साबांखा विभागात दोन दशकांहून अधिक काळ काम करणाऱ्या या सर्व अभियंत्यांची ही पहिलीच पदोन्नती होती.

दैनिक गोमन्तक

Public Works Department: सार्वजनिक बांधकाम खात्यातील (साबांखा) 70 कनिष्ठ अभियंता तथा तांत्रिक साहाय्यकांना पदोन्नतीची लॉटरी लागली आहे. अनेक वर्षांपासून याच पदावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची बढतीची अपेक्षापूर्ती झाली आहे.

गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीसी) जोस मॅन्युएल नोरोन्हा यांच्या अध्यक्षतेखाली रीतसर गठीत केलेल्या विभागीय पदोन्नती समित्यांच्या माध्यमातून काल साबांखातील सत्तर अधिकाऱ्यांना कनिष्ठ अभियंता/तांत्रिक साहाय्यकावरून सहायक अभियंता या पदावर बढती देण्याची शिफारस केली आहे.

विभागात दोन दशकांहून अधिक काळ काम करणाऱ्या या सर्व अभियंत्यांची ही पहिलीच पदोन्नती होती. आयोगाने अधिकाऱ्यांना विभागातील कार्यकारी अभियंता (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) या पदावर पदोन्नती देण्याची शिफारस केली आहे.

याशिवाय आयोगाने आरोग्य सेवा संचालनालयातील उपसंचालक पदावर एका अधिकाऱ्याची आणि जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता पदावर एका अधिकाऱ्याची शिफारस केली आहे. या महिन्याच्या अखेरीस सध्याचे संचालक सेवानिवृत्त झाल्यावर गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची अभियोजन संचालकपदावर आयोगाने शिफारस केली आहे.

आयोगाने पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालकपदी एका अधिकाऱ्याची नियुक्तीची करण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर सात अधिकाऱ्यांची कृषी सहायक संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नती देण्यात येणारे इतर अधिकारी पुराभिलेख विभाग आणि कला व संस्कृती खात्यातील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT